लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : पिस्तुलाच्या धाकाने तरुणाला धमकावून त्याच्याकडील सोनसाखळी, अंगठी असा ऐवज लुटून नेल्याची घटना येरवडा भागात घडली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली.

सुदेश गायकवाड, निखिल कांबळे, अतिब अकील सय्यद (तिघे रा. येरवडा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी त्यांच्याबरोबर असलेल्या दोन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत रुद्रांक्ष श्याम गलांडे (वय २३, रा. तुळजाभवानीनगर, खराडी) याने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रुद्रांक्ष येरवड्यातील लक्ष्मीनगर परिसरातून शनिवारी सायंकाळी निघाला होता.

आणखी वाचा-कृषीच्या २५८ जागांच्या मागणीपत्राची एमपीएससीकडून परतपाठवणी

हैद्राबादी हॉटेलजवळ आरोपी गायकवाड, कांबळे, सय्यद आणि त्यांच्याबरोबर असलेल्या दोन साथीदारांनी रुद्रांक्षला अडवले. त्यांनी पिस्तुलासारख्या शस्त्राचा धाक दाखविला. पिस्तूल पोटाला लावून जीवे मारण्याची धमकी दिली. गळ्यातील सोनसाखळी आणि अंगठी असा २५ हजारांचा ऐवज धमकावून काढून घेतला, असे रुद्रांक्ष गलांडेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पसार झालेल्या तिघांना पोलिसांनी अटक केली असून, सहायक पोलीस निरीक्षक साळुंके तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yerawada police arrested three people for robbed young man at gunpoint pune print news rbk 25 mrj