डोंगरउतारावरील दगड कोसळून गाडल्या गेलेल्या दुर्देवी माळीणच्या घटनेला
अशी असतील पुनर्वसित घरे
माळीणची दुर्घटना घडल्यानंतर प्रशासनाने अडिवरे, झांजरेवाडी व कोकणेवाडी या तीन जागा पाहिल्या. परंतु, यातील एकही जागा निश्चित होऊ शकली नाही. त्यानंतर कशाळवाडीची जागा पाहिली. परंतु येथे ८ एकर जागा मिळू शकली नाही म्हणून चिंचेचीवाडी व आमडे येथील दोन जागा पाहण्यात आल्या. यातील आमडे जागेला ग्रामस्थ व भारतीय भूशास्त्र सर्वेक्षण विभाग (जीएसआय) अशी सर्वानी सहमती दिली. परंतु, आता ग्रामस्थांमध्ये या जागेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. स्थानिकांना दीड गुंठय़ाच्या प्लॉटमध्ये घरे वेगवेगळी बांधून हवी आहेत. कारण त्यांना कोंबडय़ा, शेळ्या पाळाव्या लागतात, बल सांभाळावे लागतात, शेण टाकायला उकीरडा लागतो, सरपण भरावे लागते.या मुद्दय़ांबाबत माळीण पुनर्वसनाचा आराखडा तयार केलेले वास्तुविशारद योगेश राठी यांनी सांगितले की, माळीणचा परिसर डोंगराळ आहे. येथे पुन्हा अशी घटना घडू नये अशी जागा निश्चित करणे अतिशय अवघड होते. आमडेची जागा योग्य वाटली म्हणून ही जागा निश्चीत करण्यात आली. माळीणची घरे भूकंपरोधक बनविण्यात येणार आहेत. लोकांनी याबाबत काही चिंता करू नये. येथील एका घराला ६ ते ८ लाख रूपये खर्च येणार आहे. चुकून डोंगरावरून एखादा दगड गडगडत खाली आला तर तो थांबावा यासाठी गावाच्या मागे डोंगरपायथ्याशी मोठी संरक्षक िभत बांधली जाणार आहे. तसेच डोंगरावरील जमीन पक्की राहावी यासाठी झाडे लावली जाणार आहेत.
माळीण दुर्घटनेवर ‘पाठय़पुस्तकात धडा
माळीण येथे घडलेल्या नसíगक आपत्तीची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, या उद्देशाने इयत्ता पाचवीच्या बालभारतीच्या पुस्तकात ‘माळीण गाव : एक घटना’ हा पाठ समाविष्ठ करण्यात आला आहे. पाचवीच्या अभ्यासक्रमात बदल झाल्याने आपत्ती, दुर्घटना व व्यवस्थापनाची विद्यार्थी दशेतच माहिती व्हावी म्हणून या पाठाचा पाठय़पुस्तकात समावेश झाला आहे. या पाठात घटनेसंदर्भात वर्तमान पत्रातील बातम्यांच्या शीर्षकांची कात्रणे देण्यात आली आहेत.