International Day of Yoga 2023 पुणे : जी-२० अंतर्गत शिक्षण कार्यगटाच्या बैठकीसाठी पुण्यात आलेल्या विविध देशातील प्रतिनिधींसह केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘योग’ साधला. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात झालेल्या कार्यक्रमात एकत्रित योगासने घालण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या काही वर्षांपासून २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या अंतर्गत शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीसाठी योगासने करण्यात येतात. या पार्श्वभूमीवर आज आंतरराष्ट्रीय योग दिन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या खाशाबा जाधव क्रीडा संकुलात साजरा करण्यात आला. जी-२० परिषदेसाठी विविध देशांतून आलेले प्रतिनिधीही त्यात उत्साहाने सहभागी झाले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुरेश गोसावी या वेळी उपस्थित होते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yoga by dharmendra pradhan chandrakant patil with foreign guests pune print news ccp 14 amy