लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: तरुण मुलगा सतत आजारी पडत असल्याने पित्याने त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना हडपसर भागात घडली. या प्रकरणी पित्याला पोलिसांनी अटक केली.

Baba Siddique Murder Investigation Latest Update
Baba Siddique Murder : बाबा सिद्दिकींचे मारेकरी गोळीबार करून पळाले नाहीत, लीलावती रुग्णालयात जाऊन…, पोलीस चौकशीत खुलासा
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
One died in an accident, accident Ovala Naka,
ठाणे : अपघातात एकाचा मृत्यू, ओवळा नाका येथील घटना
youth stabbed in head, Thane, Thane crime news,
ठाणे : वाद सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या डोक्यात चाकूने भोसकले
Baba Siddique murder Accused Arrested
Baba Siddique Murder : मुंबई पोलिसांची दंगल उसळलेल्या जिल्ह्यात २५ दिवस शोधमोहिम; बाबा सिद्दिकी हत्याप्रकरणातील आरोपीला नेपाळ सीमेजवळ बेड्या
bund garden road, attack on youth, Pune,
पुणे : बंडगार्डन रस्त्यावर तरुणाचा खुनाचा प्रयत्न, दोघांविरुद्ध गुन्हा
minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
construction worker dies after gets trapped in jcb machine
जेसीबी यंत्राखाली सापडून बांधकाम मजुराचा मृत्यू

अभिजीत बाबुराव जायभाय (वय २८, रा. तुकाईदर्शन, काळेपडळ, हडपसर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी वडील बाबुराव दिनकर जायभाय (वय ५०) यांना अटक करण्यात आली. अभिजीतची आई सुनीता यांनी या संदर्भात हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जायभाय कुटुंबीय हडपसर भागातील तुकाईदर्शन परिसरात भाडेतत्त्वावर खोली घेऊन राहत आहेत. बाबुराव हमाली करतात. मुलगा अभिजीत काही काम करत नव्हता. तो सतत आजारी पडत होता. त्याच्या उपचाराचा खर्च पेलवत नसल्याने अभिजीतचा गळा दाबून बाबुराव यांनी खून केला.

आणखी वाचा- मुंबई-पुणे महामार्गावर लोखंडी सळई चोरणारी टोळी जेरबंद

या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख, हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे, गु्न्हे शाखेचे निरीक्षक दिगंबर शिंदे, विश्वास डगळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. बाबुराव यांना अटक करण्यात आली. पोलीस निरीक्षक विश्वास डगळे तपास करत आहेत.