पुणे :‘प्री वेडिंग शूट’च्या आमिषाने चेन्नईतील एका छायाचित्रकार तरुणाची फसवणूक करण्यात आली. पुणे आणि गोव्यात छायाचित्र काढण्याचे आमिष दाखवून छायाचित्रकाराला पुण्यात बोलावून घेतले.पुणे स्टेशन परिसरातील एका लाॅजमधून तीन कॅमेरे, लेन्स, तसेच अन्य साहित्य असा १२ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन चोरटे पसार झाले.

याप्रकरणी दोन चोरट्यांविरुद्ध बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत छायाचित्रकार राघवेंद्र एम. गोकुळ (वय २९. रा. शांतीनगर, व्यासरपाडी, चेन्नई, तामिळनाडू) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ जानेवारी रोजी चोरट्यांनी राघवेंद्र यांच्या भावाच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. पुणे आणि गोव्यात ‘प्री वेेडिंग शूट’ करायचे आहे. निवास, तसेच प्रवास खर्चाची व्यवस्था करण्यात येईल. या कामाचे तीन लाख रुपये देण्यात येतील, असे आमिष चोरट्यांनी त्यांना दाखविले. त्यानंतर चोरट्यांनी त्यांना ऑनलाइन पद्धतीने सुरुवातीला १९ हजार रुपये पाठविले.

Waqf Board Bill JPC meeting
Waqf Board Bill: संयुक्त संसदीय समितीच्या बैठकीत राडा; अरविंद सावंत, असदुद्दीन ओवेसींसह १० खासदार निलंबित
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Torres
Maharashtra News Updates: टोरेस गैरव्यवहार प्रकरणी ईडीची मोठी कारवाई, बँक खाती गोठवली
beggar murder news in Pune,update in marathi
पुण्यातील लष्कर भागात भिक्षेकऱ्याची मारहाण करुन हत्या
woman alleges rape after locking in home forced for religious conversion
पुणे : धर्मांतर करण्यासाठी महिलेला डांबून ठेवून बलात्कार; विमानतळ पोलिसांकडून महिलेसह तिघांना अटक
Blast in Maharashtra’s Bhandara Ordnance Factory| Explosion at Bhandara Ordnance Factory
Bhandara Ordnance Factory Blast : भंडारा आयुध निर्माण कंपनीत स्फोट; मोठी जीवितहानी? अनेक गावांना हादरे
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: जागतिक महासत्तेच्या चाव्या पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताब्यात; अमेरिकेत मोठ्या विजयासह सत्तारूढ होणार!
ashish shelar uddhav thackeray (2)
“करगोटा निसटायच्या वयात…”, शेलारांची उद्धव ठाकरेंवर टीका; म्हणाले, “अमित शाहांच्या पाठीवर वळ…”

हेही वाचा…पुण्यातील लष्कर भागात भिक्षेकऱ्याची मारहाण करुन हत्या

२२ जानेवारी रोजी राघवेंद्र आणि त्यांचा भाऊ गोविंदाराजू मध्यरात्री चेन्नईहून विमानाने पुण्याकडे निघाले. पुण्यात पहाटे ते विमानाने आले. त्यानंतर पुणे स्टेशन परिसरातील एका लाॅजमध्ये राहण्याची व्यवस्था केली असल्याचे त्यांना सांगण्यात आले. दुसऱ्या दिवशी सकाळी आठच्या सुमारास त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधण्यात आला. कोंढवा येथील व्यक्तीचे काम आहे. त्याला भेटण्यासाठी कोरिएंथन क्लबजवळ जायचे आहे, असे चोरट्यांनी त्यांना सांगितले. त्यानुसार राघवेंद्र आणि त्यांचा भाऊ मोटारीतून तेथे गेले. तेव्हा चोरट्याचा मोबाइल क्रमांक बंद असल्याचे लक्षात आले. तासभर तेथे थांबल्यानंतर दोघे जण पुन्हा पुणे स्टेशन परिसरातील लाॅजवर आले. तेव्हा लाॅजमधील खोलीतून तीन कॅमेरे, लेन्स, अन्य साहित्य चोरीला गेल्याचे लक्षात आले. राघवेंद्र यांनी या घटनेची माहिती लाॅज व्यवस्थापाकाला दिली. लाॅजमधील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात आले. तेव्हा एक जण लाॅजमधील खोलीतून कॅमेरे आणि अन्य साहित्य घेऊन निघाल्याचे आढळून आले. लाॅजमधील खोली आरक्षित करण्यासाठी दिलेल्या आधारकार्डची तपासणी करण्यात आली. तेव्हा आधारकार्डवरील चोरट्यांचा पत्ता तेलंगणातील निजमाबाद आणि नागपूरमधील असल्याचे आढळून आले. राघवेंद्र यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीस उपनिरीक्षक गणेश चव्हाण तपास करत आहेत.

Story img Loader