लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार संगणक अभियंता तरुण मृत्युमुखी पडल्याची घटना नगर रस्त्यावरील खराडी भागात मंगळावरी सकाळी घडली. अपघातानंतर डंपरचालक पसार झाला असून त्याच्याविरुद्ध चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

चैतन्य उमेश शिंदे (वय २३, रा सुप्रीम आंगण सोसायटी, वाघोली ) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. चैतन्यने संगणकशास्त्र अभ्यासक्रम नुकताच पूर्ण केला होता. तो खराडी येथील एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीत नोकरीस लागला होता. दुचाकीस्वार चैतन्य मंगळवारी सकाळी साडेसहाच्या नगर रस्त्याने निघाला होता. रिलायन्स मार्टजवळ भरधाव डंपरने दुचाकीस्वार चैतन्यला धडक दिली. दुचाकीस्वार चैतन्य फेकला गेल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता डंपरचालक पसार झाला.

आणखी वाचा-पुणे : रुग्णालयात सौर उर्जा यंत्रणा बसविण्याच्या आमिषाने डॉक्टरची फसवणूक

अपघातानंतर रहिवासी आणि पोलिसांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. अपघातात चैतन्यच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारादरम्यान तो मरण पावला. अपघातानंतर पसार झालेल्या डंपरचालकाचा शोध घेण्यात येत असून, पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. डंपरचालक हडपसरकडे पसार झाल्याचे दिसून आले.

नगर रस्त्यावरील वाहतूक धोकादायक

नगर रस्त्यावरील खराडी, वडगाव शेरी, वाघोली परिसरात गंभीर स्वरुपाच्या अपघाताच्या घटना सातत्याने घडतात. नगर रस्त्याचा वापर जड वाहने करतात. वाघोली भागात नागरिकीकरण वाढले आहे. जड वाहनांमुळे गंभीर, तसेच प्राणांतिक अपघाताच्य घटनांमध्ये वाढ झाली आहे. भरधाव वेगामुळे गंभीर स्वरुपाच्या अपघाताच्या घटना घडतात.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Young computer engineer died in a collision with a dumper pune print news rbk 25 mrj