सिंहगड रस्ता परिसरातील एका बांधकाम व्यावसायिकाला तीन कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या उच्चशिक्षित तरुणाला पोलिसांनी गजाआड केले. अमितकुमार बोधे (वय ३०, रा. ऑप्युलन्स सोसायटी, नऱ्हे) असे त्याचे नाव आहे. नऱ्हे परिसरातील एका बांधकाम व्यावसायिकाने ऑप्युलन्स सोसायटी ही चौदा मजली इमारत बांधली असून बोधे याने त्याला पंचवीस लाख देऊन सदनिकेची नोंदणी केली होती. त्यानंतर बोधे याने उर्वरित पैसे न देता सदनिका ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. बांधकाम व्यावसायिकाच्या विरुद्ध शासकीय यंत्रणेकडे तक्रार अर्ज बोधे याने दिले. त्यानंतर त्याने सोसायटीतील सभासदांना एकत्र करून बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध पुन्हा तक्रारी केल्या. दरम्यान सोसायटीतील सभासदांना गप्प करतो. त्यासाठी तीन कोटी रुपये देण्याची मागणी बोधे याने केली. अखेर बोधे याच्या धमक्यांना कंटाळलेल्या बांधकाम व्यावसायिकाने पोलिसांकडे तक्रार केली.
सिंहगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक देवेंद्र जगताप, किरण देशमुख, संतोष सावंत, संग्राम शिनगारे यांनी ही कारवाई केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा