पुणे : पुण्यातील कोथरूड भागात दुचाकीस्वार अभियंता देवेंद्र जोग या तरुणाला मारहाण झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली.द्ध गुन्हा दाखल शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीतून दुचाकी काढण्याचा प्रयत्न करत असताना तरुणाला मारहाण करण्यात आली.या प्रकरणी तिघांविरुकरण्यात आला असून,या प्रकरणी तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.तर घटनेमध्ये मारहाण करण्यात आलेला तरुण देवेंद्र जोग भाजपचा कार्यकर्ता असल्याचे समोर आले आहे.यामुळे शहराच्या राजकारणात चर्चाना उधाण आले.
या घटनेबाबत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना विचारले असता ते म्हणाले,” कोथरूड भागातील देवेंद्र जोग हा भाजपच अनेक वर्षांपासून काम करित आहे.तर तो माझ्या ऑफिसमध्ये काम करीत नाही.पण त्याला ट्रॅफिकमधून जाताना मारहाण झाल्याची घटना घडली आहे.त्याबाबत पोलीस प्रशासन चर्चा केली आहे.या घटनेतील काही आरोपींना अटक देखील झाली आहे.पण मला एक सांगायचे की,पुणे शहरातील कोणत्याही भागात अशा घटना घडता कामा नये,त्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी कडक कारवाई केली पाहिजे,अशी भूमिका त्या प्रकरणावर त्यांनी मांडली.
पुणे शहरातील काही गुंडाची मध्यंतरी ओळख परेड घेऊन पोलिसांनी दम भरला होता.मात्र तरी देखील सोशल मीडियावर गुंडाचे रिल्स व्हायरल होत आहे. यातून खंडणीचे प्रकरणसमोर येत आहेत.त्या प्रश्नावर ते म्हणाले,” पुणे शहराची संस्कृती वेगळी आहे. माझ्या पुणे शहराच नाव खराब नाही झाल पाहिजे,आमच्या नव्या पिढीने हे आदर्श घ्यायचे का ? या सर्व गोष्टी लक्षात घेऊन पुणे शहरातील सर्व घटना थांबल्या पाहीजेत, त्यामुळे आता पुणे पोलिसांनी आत्मपरीक्षण केल पाहिजे,त्याचबरोबर सोशल मीडिया जे काही चाललय,त्याबाबत पुणे पोलीस डोळे बंद करून बसले आहेत का ? आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून दहा वेळा एकच गोष्ट सांगायची का ? आता याकडे पुणे पोलिसांनी लक्ष दिले पाहिजे, अशा शब्दात पुणे पोलिसांना त्यांनी सुनावले.