पुणे : एकतर्फी प्रेमातून युवतीच्या दुचाकीसह तीन दुचाकी पेटविल्याची घटना लोहगाव भागात घडली. या प्रकरणी एका युवकास विमानतळ पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी युवकाच्या साथीदाराच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

श्रीराम घाडगे (रा. वाघोली, नगर रस्ता) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी घाडगे याच्या साथीदाराच्या विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत युवतीच्या वडिलांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. युवती आणि आरोपी घाडगे एकाच महाविद्यालयात शिकत आहेेत. घाडगे युवतीवर एकतर्फी प्रेम करत होता. तो तिला त्रास देत असल्याने युवतीने या घटनेची माहिती वडिलांना दिली. युवतीच्या वडिलांनी घाडगेला समज दिली होती.

हेही वाचा >>> जेजुरीच्या खंडोबा गडावर तरुणाला भाविकांच्या टोळक्याकडून बेदम मारहाण

घाडगे आणि साथीदार युवती राहत असलेल्या सोसायटीच्या आवारात मध्यरात्री आले. त्यांनी युवतीची दुचाकी पेट्रोल ओतून पेटवून दिली. शेजारी लावलेल्या दोन दुचाकी पेटवून घाडगे आणि साथीदार पसार झाले. याबाबत पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तपास करून घाडगेला पकडले. पोलीस हवालदार धेंडे तपास करत आहेत.