पुणे : कात्रज तलावात तरुणीने उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली. अग्निशमन दलाकडून शोधमोहीम राबविण्यात आली. तलावात बुडलेल्या तरुणीचा मृतदेह सापडला असून, तिची ओळख अद्याप पटलेली नाही.

तरुणीचे वय अंदाजे २३ वर्षे असल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलिसांनी दिली. याप्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली. शनिवारी मध्यरात्री एका तरुणीने कात्रज येथील नानासाहेब पेशवे तलावात उडी मारल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. त्यानंतर जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. अंधार असल्याने शोधमोहीम थांबविण्यात आली. त्यानंतर रविवारी पुन्हा शोधमोहीम राबविण्यात आली. बोटीतून जवानांनी पाहणी केली. तरुणीचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे आढळून आले.

हेही वाचा – विदर्भात अवकाळीसह गारपिटीचा अंदाज.. कोणत्या जिल्ह्यांना इशारा?

हेही वाचा – देशभरात पाणी टंचाईच्या झळा… सर्वाधिक भीषण टंचाई कुठे?

मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. शवविच्छेदनासाठी मृतदेह ससून रुग्णालयात पाठविण्यात आला. आत्महत्या करणाऱ्या तरुणीची ओळख पटलेली नाही. पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

Story img Loader