लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : भरधाव दुचाकी घसरुन सहप्रवासी तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना वारजे भागात घडली. अपघातास जबाबदार ठरलेल्या दुचाकीस्वार तरुणाविरुद्ध वारजे पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

western railway year 2024 vasai palghar dahanu railway line 227 passengers death
वसई, नालासोपारा रेल्वे स्थानकांतील गर्दी प्रवाशांच्या जीवावर; ट्रेन मधून पडून ५० तर रुळ ओलांडताना १२८ प्रवाशांचा मृत्यू
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
stampede at Sangam ghat on Mauni Amavasya in Prayagraj on Wednesday Maha kumbh Yogi Adityanath
Stampede Breaks Out at Maha Kumbh : महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरी, तीस भाविकांचा मृत्यू
senior citizen dies in st bus accident
एसटी बसच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू
private school bus in Umarkhed accident near Palshi Fata on Saturday killing ninth grade student
भरधाव वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू, चार जखमी; वाई बसस्थानकासमोर अपघात
Maharashtra tiger deaths
विश्लेषण : वर्षाच्या पहिल्या २२ दिवसांतच ११ वाघांचा मृत्यू… महाराष्ट्रात व्याघ्रसंरक्षणाचे गांभीर्य हरवले आहे का?
Hinjewadi two girls dead marathi news
Video : हिंजवडीत सिमेंट मिक्सरच्या अपघातात दोन तरुणींचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीत कैद
19 year old girl dies after being hit by dumper accident in baner area
डंपरच्या धडकेत युवतीचा मृत्यू; बाणेर भागात अपघात, दुचाकीस्वार महिला जखमी

गौरी संजीवकुमार कलशेट्टी (वय २० रा. शिवाजी चौक, आंबेगाव) असे मृत्युमुखी पडलेल्या तरूणीचे नाव आहे. याप्रकरणी दुचाकीस्वार अभिषेक गणेश बानगुडे (वय २४ रा. नऱ्हे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत रोहित कलशेट्टी (वय ४०) यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आणखी वाचा-अत्याचारामुळे मुलाची आत्महत्या, सहकारनगर पोलिसांकडून एकास अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित यांची बहीण गौरी आणि अभिषेक हे रविवारी (२४ नोव्हेंबर) दुपारी अडीचच्या सुमारास मुळशीतील एका मंदिरात दर्शनासाठी निघाले होते. बाह्यवळण मार्गावर वारजे माळवाडी परिसरातील माई मंगेशकर रुग्णालयासमोर भरधाव वेगात मोटार आली. दुचाकीस्वार अभिषेकने ब्रेक दाबला. दुचाकी घसरुन सहप्रवासी गौरी पडली. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पोलीस उपनिरीक्षक नरळे तपास करत आहेत.

Story img Loader