पुणे : वैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार करून त्याच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना लोहियानगर भागात घडली. या प्रकरणी चौघांच्या विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रेम पाटोळे (वय २६, रा. भिमाले संकुल, पिंपळ मळा, कासेवाडी, भवानी पेठ) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी चौघा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाटोळे हा महात्मा फुले पेठेतील मध्यवर्ती अग्निशमन केंद्राच्या परिसरातून निघाला होता. त्या वेळी टोळक्याने त्याला अडवले. माझा भाऊ भरत कोळी याला मारहाण केली का, अशी विचारणा करून आरोपींनी त्याला शिवीगाळ केली. आरोपींनी पाटोळे याच्यावर कोयत्याने वार केले, तसेच बांबूने मारहाण केली.

हेही वाचा – “मित्रांनो माझ्यावर अन्याय झाला की नाही..” महाराष्ट्र केसरीवर सिकंदर शेखची प्रतिक्रिया, म्हणाला, “पुढील महाराष्ट्र केसरी चाहत्यांसाठी जिंकणार”

हेही वाचा – Nashik Graduate Constituency Election : “…तर उमेदवारीचा घोळ झाला नसता” काँग्रेस नेत्यांचा उल्लेख करत शरद पवारांचं मोठं विधान!

पाटोळे याच्यावर हल्ला करून पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक आकाश विटे तपास करत आहेत.