बाणेरमधील घटना; हॉटेल मालकासह अंगरक्षकावर गुन्हा

बाणेरमधील एका हॉटेलमध्ये वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या तरुणाला हॉटेलमधील अंगरक्षकाने बेदम मारहाण  केल्याची घटना घडली. या प्रकरणी चतु:शृंगी पोलिसांकडून दोघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत एका तरुणाने फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार बाणेर परिसरातील हॉटेलमालक आणि अंगरक्षका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार तरुण सूस परिसरात राहायला आहे. तो आणि त्याचे मित्र बाणेरमधील ठिकाणा बार येथे वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले होते. तक्रारदार तरुणाच्या मित्राने केक मागविला होता. त्या वेळी शेजारील टेबलवर बसलेल्या मुलीने मित्राच्या वाढदिवसासाठी मी केक मागविला आहे, असे सांगून तक्रारदार तरुणाशी वाद घालण्यास सुरुवात केली.

या कारणावरुन हटेलमधील अंगरक्षक आणि हॉटेलमालकाने तरुणाला बेदम मारहाण केली. तक्रारदार तरुणाच्या चुलतभावालाही मारहाण करण्यात आली. याबाबत तरुणाने तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलीस निरीक्षक संतोष कोळी तपास करत आहेत.

Story img Loader