लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : आर्थिक वादातून तरुणाने धावत्या रेल्वेगाडी खाली उडून मारुन आत्महत्या केल्याची घटना खडकी रेल्वे स्थानक परिसरात घडली. तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन पाचजणांविरुद्ध बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Woman dies after falling off her bike in Kondhwa Pune news
कोंढव्यात दुचाकी घसरुन महिलेचा मृत्यू; दुचाकीस्वार पती जखमी
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
malad east man died after struck by Electric shock
विजेचा धक्का लागून नाल्यात पडला, मालाड मधील दुर्घटनेत एकाचा मृत्यू
One died in an accident, accident Ovala Naka,
ठाणे : अपघातात एकाचा मृत्यू, ओवळा नाका येथील घटना
women committed suicide pune, husband harassment,
पतीच्या छळामुळे दोन महिलांची आत्महत्या; कोंढवा, विमानतळ पोलिसांकडून गुन्हे दाखल
Suicide bombings in Pakistan
पाकिस्तानात आत्मघातकी बॉम्बस्फोट; २७ ठार, ६२ जखमी; बलुचिस्तान प्रांतातील रेल्वे स्थानक हादरले
10th student commits suicide before pre-examination
पूर्वपरीक्षेपूर्वी दहावीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
passenger dies after st bus crash in swargate depot premises
स्वारगेट स्थानकाच्या आवारात एसटी बसच्या धडकेत प्रवासी तरुणाचा मृत्यू

ऋषीकेश जयदेव म्हसारे (वय २७, रा. इनामदारनगर, कोंढवा बुद्रुक) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी आनंद दंडनाईक, बालाजी बहिरवाल, गणेश बिबिनवरे, प्रशांत कदम, विकास कसबे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत ऋषीकेशचे वडील जयदेव रामदास म्हसारे (वय ५८) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ऋषीकेश याने ओैषधनिर्माण शास्त्र अभ्यासक्रम केला होता. तो एका ओैषध विक्री दुकानात कामाला होता. आरोपी दंडनाईक, बहिरवाल, बिबिनवरे, कदम, कसबे ओैषध विक्री दुकानात कामाला होता. त्याने त्यांच्याकडून हातउसने पैसे घेतले होते. दरमहा त्यांना तो पैसे परत करत होता. आरोपींनी त्याला त्रास देण्यास सुरुवात केल्याने तो नैराश्यात होता, असे ऋषीकेशचे वडील जयदेव म्हसारे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

आणखी वाचा-महंत रामगिरी महाराजांविरुद्ध आणखी एक गुन्हा

आरोपींच्या त्रासामुळे तो १ जून रोजी घरातून बेपत्ता झाला होता. त्याच्या वडिलांनी तो बेपत्ता झाल्याची तक्रार बिबवेवाडी पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानंतर ऋषीकेशने खडकी रेल्वे स्थानक परिसरात धावत्या रेल्वेगाडी खाली उडी मारून आत्महत्या केली. याप्रकरणी लोहमार्ग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली होती. दरम्यान, ऋषीकेशच्या आई-वडिलांशी लोहमार्ग पोलिसांनी संपर्क साधला. बेपत्ता झालेल्या मुलाची त्यांनी ओळख पटविली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने वडिलांच्या मोबाइलवर संदेश पाठविला होता. आरोपींच्या त्रासामुळे आत्महत्या करत असल्याचे त्याने संदेशात म्हटले होते. वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला, असे बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगल मोढवे यांनी सांगितले. पोलीस निरीक्षक मोढवे याप्रकरणाचा तपास करत आहेत.