लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : कोथरुड येथील एका नामांकित संस्थेत शिक्षण घेत असलेल्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. प्राथमिक चौकशीत तरुणाने प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.
विनित अरविंद मारु (वय १९, रा. ठाणे) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. विनित हा शिक्षणासाठी पुण्यात आला होता. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्याने कोथरुडमधील एका नामांकित शिक्षण संस्थेत प्रवेश घेतला होता. तो सिंहगड रस्त्यावरील एका वसतिगृहात राहत होता. विनितने हातावर ब्लेडने वार केले, तसेच त्याने विषारी औषध प्राशन केले. त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
आणखी वाचा-ससून रुग्णालयाची चौकशी समितीच चौकशीच्या फेऱ्यात
वसतिगृहातील मित्रांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी सुरक्षारक्षाकांना याबाबतची माहिती दिली. सुरक्षारक्षकांनी खोलीचा दरवाजा वाजविला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. वसतिगृहातील मित्रांकडे चौकशी केली. प्राथमिक चौकशीत विनितने प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले असून, याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे.