पुणे: मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून अवघ्या महाराष्ट्रात मराठा समाज आरक्षणासाठी आग्रही आहे. याच आरक्षणाची मागणी होत असताना अनेक मराठा समाजाच्या तरुणांनी आत्महत्या केल्याचं वारंवार समोर आलेलं आहे. पुण्यातील आळंदीत देखील अशाच प्रकारे एक घटना उजेडात आली असून सिद्धेश्वर सत्यवान बर्गे या अवघ्या २१ वर्षीय तरुणाने मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली आहे. सिद्धेश्वर हा नेहमीच मराठा आरक्षणाच्या बाजूने होता, त्याने अनेक मराठा आरक्षणाच्या आंदोलनात आणि मोर्चात सहभागी व्हायचा. परंतु, शुक्रवारी त्याने स्वतःच्या दुकानात गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे अशी त्याने त्याची शेवटची इच्छा सुसाईड नोटमध्ये व्यक्त केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा-आरक्षण देण्याची इच्छाशक्ती सरकारमध्ये आहे का? खासदार सुप्रिया सुळे यांचा सवाल

मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यासह देशभरात चर्चेला आला आहे. जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण करत दोन महिन्याच्या अटीवर मागे घेतले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून महाराष्ट्राच्या गावागावात जन आंदोलन उभारले गेले. गावागावात साखळी उपोषण करण्यात आलं. गावागावात नेत्यांना, पुढार्‍यांना बंदी घालण्यात आली. यामुळे सरकारची सर्वच बाजूने मुस्काटदाबी झाली आणि जरांगे पाटील यांची बाजू ऐकून घेण्यासाठी शासनाकडून एक शिष्टमंडळ पाठवण्यात आलं. दोन महिन्याच्या अटी आणि शर्तीनंतर जरांगे पाटलांनी त्यांचं आमरण उपोषण पाठीमागे घेतलं आहे. प्रशासनाकडून मराठा समाजाला आरक्षण मिळेल असं आश्वासन दिले गेले असले तरी पुण्याच्या आळंदीतील चिंबळी या ठिकाणी मराठा समाजाच्या सिद्धेश्वर सत्यवान बर्गे या २१ वर्षीय तरुणाने मराठा समाजाला सरकार आरक्षण देत नाही, ते मिळावं अशी इच्छा व्यक्त करत आपली जीवन यात्रा संपवली आहे. या घटनेमुळे बर्गे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सिद्धेश्वर हा कुटुंबात मोठा होता. तो चिंबळी या ठिकाणी गॅस दुरुस्तीचा व्यवसाय करायचा. शुक्रवारी दुपारी दुकानाचं शटर बंद करून त्याने दुकानातच गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बाब रात्री दहाच्या सुमारास समजल्यानंतर चिंबळी गावात शोककळा पसरली. हे सरकार आणखी किती मराठा समाजाच्या तरुणांचे बळी घेणार, मराठा समाजाला आरक्षण देणार की नाही? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.

सुसाट नोटमध्ये नेमकं काय लिहिलं आहे?

मी माझा जीव कोणाच्या त्रासाला कंटाळून दिला नाही. या सरकारच्या कार्यपद्धतीला कंटाळून जीव दिला आहे. मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे ही माझी इच्छा आहे. त्यामुळे मी माझा जीव देत आहे. कुणीही कोणाला दोष देऊ नये. मी मराठा बांधवांसाठी पाऊल उचलत आहे… फक्त माझ्या सोन्या, आप्पा, जीजी, आईला सांभाळा.