पुणे : सध्या नवरात्रोत्सव सुरू आहे. दांडिया, गरबा खेळण्यात तरुण तरुणी मग्न आहेत. गरबा खेळत असताना तरुणाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना पुण्याच्या चाकणमधून समोर आली आहे. घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. अशोक माळी असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांचं नृत्य शेकडो तरुण आणि तरुणी पाहात होते. अनेक जण त्यांचा गरबा मोबाईलमध्ये कैद करत होते.

मृत्यू कोणाला कधी गाठेल याचा भरोसा नाही. अशीच घटना पुण्याच्या चाकणमध्ये घडली आहे. लहान मुलीसह गरबा खेळत असलेल्या अशोक माळी यांना अचानक भोवळ आली आणि ते गुडघ्यावर खाली बसले. त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. अशोक माळी लहान मुलीसह गरबा खेळत होते. तरुण आणि तरुणी त्यांचा हा गरबा आपल्या मोबाईलमध्ये कैद करत होते. “घूंघट में चाँद होगा आँचल में चाँदनी” या गाण्यावर त्यांचं गरबा नृत्य सुरू होतं.

Two youths attacked with a koyta in Khadki crime news Pune news
पुणे: खडकीत दोघा तरुणांवर कोयत्याने वार
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Tanker accident shocking video goes viral on the internet truck and bike accident know in marathi
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; टँकरला धडकला, समोर मरण दिसलं पण पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा
Pushpa 2 The Rule
‘पुष्पा २’ चित्रपट पाहताना ३५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; सफाई कर्मचाऱ्याला आढळला मृतदेह
youth died on the spot in an accident today on Buldhana Chikhali state highway
स्कूलबस आणि दुचाकीची धडक, युवकाचा मृत्यू; चिखली राज्य मार्गावरील घटना
Atul Subhash
“मर्द को भी दर्द होता है!” आत्महत्येआधीचा अतुलचा तासभराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पत्नी आणि सासरच्यांवर गंभीर आरोप
A groom breaks down in tears as he watches his bride cry
नवरीला रडताना पाहून नवरदेवही रडला! VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “नशीबवान आहेस ताई तू…”
a student expressed about life after his father death
“अपघातात वडील वारले अन्…” चिमुकल्याने सांगितली व्यथा; विद्यार्थ्यांसह शिक्षकही रडले, पाहा VIRAL VIDEO

आणखी वाचा-Sushma Andhare : सुषमा अंधारेंकडून ठाकरेंच्या शिवसेनेचा पहिला उमेदवार जाहीर; पुण्यातील जागांबाबत मोठं वक्तव्य

काही मिनिटं गरबा खेळून झाल्यानंतर अशोक माळी अस्वस्थ वाटल्याने त्यांची गरबा खेळण्याची गती कमी झाली आणि ते भोवळ येऊन कोसळले. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. काही सेकंदात होत्याचं नव्हतं झालं. गेल्या काही वर्षांपासून लहानांपासून मोठ्यांपर्यंत हृदयविकाराच्या झटक्याने अनेकांचा मृत्यू झाला आहे. बदलत चाललेली जीवनशैली आणि व्यायामाचा अभाव अशा काही गोष्टींमुळे हृदयविकाराचे झटके येत असल्याचं वारंवार तज्ज्ञ डॉक्टरांनी म्हटलेलं आहे.

Story img Loader