पिंपरी- चिंचवड : बुलेट चालकाला चारचाकी चालकासोबत वाद घालणे चांगलेच महागात पडले आहे. अलंकापूरम ते देहू फाटा रोडवर घडलेल्या घटनेत बुलेट चालकाच्या पाठीमागे बसलेल्या तरुणाला आपला हात गमवावा लागला आहे. चारचाकीचा पाठलाग करून डाव्या बाजूने ओव्हरटेक करत असताना भरधाव बुलेट वरील तरुणाचा हात विजेच्या लोखंडी खांबाला लागल्याने अक्षरशः खांद्यापासून उखडून पडला आहे. ही घटना मंगळवारी रात्री साडेसातच्या सुमारास आळंदी- देहू फाटा रोडवर घडली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चारचाकीची बुलेटला पाठीमागून किरकोळ धडक बसली. बुलेटची नेमप्लेट वाकडी झाली. यावरूनच बुलेट चालक आणि चारचाकी चालक यांच्यात वाद झाले. ते वाहतूक पोलिसांनी मिटवले. परंतु, बुलेटवरील तरुणाने इतर काही जणांना त्या ठिकाणी बोलावले. स्वतः त्याच्या बुलेटवर एक जण बसवला. चारचाकी चालकाचा पाठलाग सुरू केला. वाहनावर लाथाने मारहाण करत होते. घाबरलेला कारचालक थांबायला तयार नव्हता. बुलेट चालक कारच्या डाव्या बाजूने ओव्हरटेक करत होता. तेव्हा, रस्त्याच्या कडेला लोखंडी विजेच्या खांबाला बुलेटवर पाठीमागे बसलेल्या तरुणाचा हात लागला आणि अक्षरशः खांद्यापासून वेगळा झाला (हात खांद्यापासून तुटला आहे).

आणखी वाचा-अजित पवारांनी बारामतीमधूनच लढण्याचा सर्मथकांचा आग्रह

मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्याने तरुणाला तातडीने रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. सध्या तरुणावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात झाल्यानंतरही काही तरुण चारचाकी चालकाचा पाठलाग करत होते. अखेर देहू फाटा या ठिकाणी चारचाकीला गाठून गाडीची तोडफोड केली. चारचाकी चालकाला किरकोळ मारहाण करण्यात आल्याचx पोलिसांनी सांगितलं आहे. दिघी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Young man hand got broke during bullet rider car drivers minor fight kjp 91 mrj