पुणे : ‘रांजणगाव औद्योगिक क्षेत्रात नोकरी मिळेल, अशी माहिती एकाकडून मिळाली. त्यामुळे शिवाजीनगरहून निघालो. परंतु, वाघोलीला पोहोचेपर्यंत शेवटची बस निघून गेली होती. त्यामुळे रस्त्याच्या कडेला पदपथावर झोपलो. पहाटेच्या वेळी अचानक मोठ्या आवाजाने जाग आली. पण उठून मागे सरकण्यासही वेळ मिळाला नाही…’ अंगावर काटा आणणारा अनुभव वाघोलीतील अपघातात जखमी झालेला तरुण कथन करत होता…

वाघोलीत भरधाव डंपरने पदपथावर झोपलेल्या नागरिकांना चिरडले. या अपघातात संगमनेर येथील सुदर्शन वैराट (वय १८) हा तरुण जखमी झाला आहे. त्याच्या उजव्या पायाचे हाड तुटले असून, त्याच्यावर ससून सर्वोपचार रुग्णालयातील अस्थिव्यंगोपचार विभागात उपचार सुरू आहेत. सुदर्शन नोकरीच्या शोधात पुण्यात आला होता. त्याच्या ओळखीच्या एका व्यक्तीने सुरुवातीला शिवाजीनगर भागातील हॉटेलमध्ये सुरक्षारक्षक म्हणून नोकरीस लावले. तिथे राहण्याची सोय नसल्याने पाच ते सहा दिवसांत सुदर्शनने नोकरी सोडली. त्याला रांजणगाव औद्योगिक क्षेत्रात नोकरी मिळत असल्याचे समजले. त्यामुळे तो रविवारी शिवाजीनगरहून वाघोलीकडे निघाला होता.

young man injured in Wagholi accident described being woken by loud noise
Wagholi Accident: तब्बल चार तासांच्या शस्त्रकियेनंतर तिला मिळालं जीवदान
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “आमच्याकडे मान-अपमान मनात होतो अन् त्याचं संगीत…”, देवेंद्र फडणवीसांची टोलेबाजी!
decisions in GST Council’s 55th meeting
अग्रलेख: अब तक ५६!
Image of Allu Arjun And Hyderabad police.
Allu Arujn : अल्लू अर्जुनच्या अडचणी वाढल्या! चौकशीसाठी पुन्हा समन्स, पोलीस उच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत
Bullet Train Bridge Collapse in Anand Gujarat
Bullet Train Bridge Collapse : बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पूल कोसळला, तीन मजूर ठार; ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकले, बचावकार्य जारी
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
dhananjay munde valmik karad
Dhananjay Munde: “हे घ्या धनंजय मुंडे-वाल्मिक कराड यांच्यातील संबंधाचे धडधडीत पुरावे”, अंजली दमानियांनी सातबारेच केले शेअर!

हेही वाचा…Wagholi Accident: तब्बल चार तासांच्या शस्त्रकियेनंतर तिला मिळालं जीवदान

‘शिवाजीनगरहून वाघोलीला पोहोचण्यास मला उशीर झाला. माझ्याकडे जेवणासाठी पैसे नसल्याने मी आईला कॉल केला. आईने मला पैसे पाठविल्यानंतर मी जेवण केले. वाघोलीहून रांजणगावला जाण्यासाठी बस नसल्याने काय करायचे, हा प्रश्न होता. वाघोलीत रस्त्याच्या कडेला पदपथावर अनेक जण झोपले होते. त्यामुळे रात्री इथेच झोपावे आणि सकाळी रांजणगावला जावे, असा विचार मी केला. तिथे झोपलेल्या एका वृद्ध व्यक्तीकडून मी अंगावर पांघरण्यासाठी चादर घेतली. रात्री अचानक मोठा आवाज आला. मी डोळे उघडून पाहिले, तर वेगाने अंगावर आलेला डंपर मला दिसला. मला मागे सरकण्यासही वेळ मिळाला नाही. मी काही हालचाल करेपर्यंत डंपर माझ्या पायावरून गेला होता. अचानक मोठा आरडाओरडा झाल्याने लोक जमा झाले आणि त्यांनी माझ्यासह इतर जखमींना वाघोलीतील रुग्णालयात हलविले. तिथून आम्हाला ससून रुग्णालयात आणण्यात आले,’ असे सुदर्शनने सांगितले.

हेही वाचा…भुजबळांसंदर्भात अजित पवार यांची सावध भूमिका

अजूनही अपघाताच्या धक्क्यात

या अपघातात रेनिशा पवार ही महिला आणि रोशन भोसले हा ७ वर्षांचा मुलगा जखमी झाले आहेत. या दोघांवर ससूनमध्ये उपचार सुरू आहेत. रोशन वाघोलीत सिग्नलवर फुगे विकतो. मात्र, अपघाताच्या धक्क्यातून तो अद्याप सावरलेला नाही. त्याला नातेवाइकांची नावेही व्यवस्थित सांगता येत नाहीत. त्याच्या उजव्या पायाचे हाड मोडले आहे. तो रुग्णालयातील डॉक्टरांसह परिचारिकांना, ‘मी कधी बरा होणार,’ एवढाच प्रश्न विचारत आहे.

Story img Loader