लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : चेष्टा मस्करीतून झालेल्या वादातून तरुणावर कोयत्याने वार करून खून करण्यात आल्याची घटना उत्तमनगर परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली.

जयदीप ज्ञानेश्वर भोंडेकर (वय २२, रा. गुजर कॉम्प्लेक्स, मासे आळी, उत्तमनगर, एनडीए रस्ता) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अमित सुदाम गुजर (वय २१, रा. मासे आळी, उत्तमनगर, एनडीए रस्ता) याला अटक करण्यात आली. याबाबत जयदीपची आई लक्ष्मी यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. जयदीप रविवारी दुपारी घरी झोपला होता. त्यावेळी आरोपी अमित त्याच्या घरी आला. ‘दादा पोतं उचलायला जायचे आहे. माझ्यासोबत चल’, असे त्याने जयदीपला सांगितले. जयदीप घरातून बाहेर पडला. काही वेळानंतर जयदीपच्या ओरडण्याचा आवाज आला. अमितने जयदीपच्या डोक्यात कोयत्याने वार केल्याचे उघडकीस आले.

आणखी वाचा-पिंपरीतील रस्तेदुरुस्तीची निकृष्ट कामे; ठेकेदारांवर…!

गंभीर जखमी झालेल्या जयदीपला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा सोमवारी सकाळी रुग्णालयात मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी अमितला अटक केली असून, चेष्टा मस्करीतून त्याने जयदीपचा खून केल्याचे तपासात उघडकीस आले आहे, अशी माहिती परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले.

शहरात आठवडाभरात चार खून

राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा १ सप्टेंबर रोजी नाना पेठेत खून करण्यात आला. त्यानंतर गुलटेकडीतील डायस प्लाॅट परिसरात सराइतांनी एका तरुणाचा खून केला. रविवारी (८ सप्टेंबर) दारू पिऊन त्रास दिल्याने महिलेने पतीवर चाकूने वार केल्याची घटना सिंहगड रस्ता परिसरातील नऱ्हे भागात घडली. रविवारी दुपारी एनडीए रस्त्यावरील उत्तमनगर भागात जयदीप भोंडेकर याचा चेष्टा मस्करीतून मित्राने खून केल्याची घटना घडली.