पूर्ववैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वार करुन खून करण्यात आल्याची घटना येरवडा भागात घडली. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी एकास अटक केली. इंजमाम जुबेरी इद्रिसी (वय २२, रा. दरबार बेकरीजवळ, येरवडा) असेे खून झालेल्याचे नाव आहे.
हेही वाचा- पुण्यातील कोंढव्यात अमली पदार्थ तस्कराकडून दहा लाखांचे मेफेड्रोन जप्त
या प्रकरणी आरोपी माेहसीन उर्फ मोबा बडेसाब शेख, मोईन कालू शेख, शहानवाज शेख (तिघे रा. लक्ष्मीनगर, येरवडा) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी शहानवाज शेख याला अटक करण्यात आली आहे. इंजमामचा भाऊ अन्सार (वय १८) याने याबाबत येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी मोईन शेख याच्याशी इंजमामची वर्षभरापूर्वी भांडणे झाली होती. आरोपींनी त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन खून केला. पसार झालेले आरोपी मोहसीन, मोईन यांचा शोध घेण्यात येत असून गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उत्तम चक्रे तपास करत आहेत.