पुण्यातील वाकड येथे श्रावणाआधी मांसाहार आणि पार्टी करणे एका तरुणाच्या जीवावर बेतले आहे. क्षुल्लक वादातून येथे आठ ते नऊ जणांनी एका तरुणाची चाकू भोसकून हत्या केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकूण ९ जणांना ताब्यात घेतले आहे. खंडू उर्फ दीपक गायकवाड असे खून झालेल्या १९ वर्षीय तरुणाचे नाव आहे.  तर या वादात लखन लगस नावाचा तरुण जंभीर जखमी झाला आहे. जखमी झालेल्या तरुणावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याची माहिती वाकड पोलिसांनी दिली आहे. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का देण्याची शिंदेंची तयारी? स्मिता ठाकरेंनंतर ठाकरे कुटुंबातील ‘या’ सदस्याने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रावण सुरु होण्याआधी गुरुवारी वाकड परिसरातील मुठा नदी लगत दोन गट मद्यपान करण्यासाठी बसले होते. यातील एका गटातील तरुणाने त्याच्या सोबत असलेल्या अल्पवयीन मित्राला सिगारेट आणि दारू आणायला सांगितली. तेव्हा, दुसऱ्या गटातील मयत खंडूने अल्पवयीन मुलाच्या कानशिलात लगावत तू लहान आहेस, माझ्या मित्राचा भाऊ आहेस. असे व्यसन करू नकोस. दारू, सिगारेट पिऊ नकोस असे सांगितलं. याचा राग मनात धरून दुसऱ्या गटातील तरुणांनी खंडू उर्फ दीपकचा धारदार चाकूने वार करून खून केला. या घटनेत आणखी एक तरुण जखमी झाला असून त्याची प्रकृती अत्यंत गंभीर आहे.

हेही वाचा >>> “…मला चिंता वाटतेय” न्यायालयाच्या ‘त्या’ इशाऱ्यानंतर ओबीसी आरक्षणावर शरद पवारांचे विधान

दरम्यान, जखमी झालेल्या तरुणावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी अल्पवयीन मुलासह एकूण नऊ जणांना वाकड पोलिसांनी ताब्यात घेतले असून वाकड पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Young man murdered in pune wakad while clash in party kjp