लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : भरधाव दुचाकी दुभाजकावर आदळून दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना येरवड्यातील कॉमरझोन आयटी पार्क रस्त्यावर घडली. आदित्य प्रमोद सावंत (वय २३, रा. पांचाळ बिल्डींग, आळंदी रस्ता, कळस) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक विशाल टकले यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
आणखी वाचा-आता पिंपरी-चिंचवडकरांना मिळणार हवामान बदलाची इंत्यभूत माहिती, दुर्गादेवी टेकडीवर…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार आदित्य सोमवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास येरवड्यातील कॉमरझोन आयटी पार्क रस्त्याने भरधाव वेगाने निघाला होता. त्यावेळी दुचाकीस्वार आदित्यचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी दुभाजकावर आदळली. आदित्य गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. पोलीस कर्मचारी जाधव तपास करत आहेत.