लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : मैत्रिणीच्या समाजमाध्यमातील खात्यावर संदेश पाठविल्याने जाब विचारणाऱ्या तरुणावर टोळक्याने तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याची घटना हडपसर भागात घडली. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

UP Crime Scene
UP Crime : पत्नीच्या लग्नापूर्वीच्या प्रेमसंबंधामुळे आख्खं कुटुंब उद्ध्वस्त! प्रियकराने एकाचवेळी केली चौघांची हत्या; चिमुरड्या मुलींवरही घातल्या गोळ्या
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
labor suicide contractor torture
ठेकेदाराच्या त्रासामुळे कामगाराची चाकूने गळा चिरून आत्महत्या, आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी ठेकेदार अटकेत
case against father, father abusing daughter,
मुंबई : पाच वर्षांपासून मुलीवर अत्याचार करणाऱ्या पित्याविरोधात गुन्हा
attack on Prithvi deshmukh
धक्कादायक! ठाकरे गटाच्या आमदार पुत्रावर सशस्त्र हल्ला; कायदा व सुव्यवस्था…
In Badlapur case accused Akshay Shinde Thane alleged encounter
चकमकी अखेर पोलिसांवरच का शेकतात?
Murder of husband who is obstructing in immoral relationship
अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा खून; पत्नीसह प्रियकर गजाआड, आरोपींकडून आत्महत्येचा बनाव
Due to indebtedness women try to commit suicide in Indrayani river Alandi
आळंदी: इंद्रायणी नदीत ‘ती’ मृत्यूची वाट पाहत बसली; पण नियतीला काही वेगळच…

अमर बसवराज जमादार (वय २०, रा. गोपाळपट्टी, मांजरी), अमन अशोक नरोटे (वय १९, रा. अष्टविनायक कॉलनी, काळेपडळ, हडपसर), श्रीपती संतोष सरोदे (वय १९, रा. साडेसतरानळी, हडपसर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. अमोल राजाराम घाटे (वय २५, रा. माळवाडी, हडपसर, मूळ रा. नांदेड) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याबाबत घाटे याने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आणखी वाचा-रिंग रोडच्या पूर्व मार्गासाठी भूसंपादनाला अडथळा…खेड तालुक्यातील १२ गावांमधील जमिनींबाबत पेच

आरोपींनी घाटे याच्या मैत्रिणीला संदेश पाठविला होता. घाटे आणि त्याचा मावस भाऊ सुदर्शन दासवड जेवण करुन रात्री निघाले होते. हडपसर भागातील माळवाडी परिसरात आरोपी जमादार, सरोदे, नरोटे आणि साथीदार थांबले होते. मैत्रिणीच्या मोबाइलवर संदेश का पाठविला, अशी विचारणा घाटेने आरोपींकडे केली. त्यानंतर आरोपींनी घाटेला शिवीगाळ करुन त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. भांडणात मध्यस्थी करणाऱ्या दासवड याच्यावर वार करुन आरोपी पसार झाले. पसार झालेल्या दोघांना पोलिसांनी पकडले असून, साथीदारांचा शोध धेण्यात येत आहे.