किरकोळ कारणावरुन तरुणावर चाकूने वार करण्यात आल्याची घटना सॅलसबरी पार्क परिसरात घडली. या प्रकरणी एकास पोलिसांनी अटक केली.सुदिन विश्वास सोनवणे (वय ३९ रा. इंदिरानगर, गुलटेकडी ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. मकरंद भीष्माचार्य कबाडे (वय ३६ ) असे गंभीर जखमीचे झालेल्याचे नाव आहे. कबाडे याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा >>> पुणे : भांडणे सोडविल्याने एकावर तीक्ष्ण शस्त्राने वार; येरवडा भागातील घटना

Youth beaten with knife and koyta in Rahatani Two arrested
पिंपरी : रहाटणीत तरुणाला चाकू, कोयत्याने मारहाण; दोघे अटकेत, तिघांविरोधात गुन्हा
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
dead body buried
अज्ञात व्यक्तीचा खून करून मृतदेह जमिनीत पुरला, अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील घटना
27 goats die after drinking water in a cowshed near Barshi
बार्शीजवळ गोठ्यात पाणी प्यायल्यानंतर २७ शेळ्यांचा मृत्यू
Nagpur, suicide , police station,
नागपूर : खळबळजनक! पोलीस ठाण्यात आरोपीने चाकू स्वत:च्या पोटात…
police arrest two for attacking youths with koyta in bibvewadi
बिबवेवाडीत तरुणांवर कोयत्याने वार; पोलिसांकडून दोघांना अटक
shahapur two Arrested Uttar Pradesh bullion shop worker murder
सराफाच्या दुकानातील कामागाराची हत्या करणाऱ्यास उत्तरप्रदेशातून अटक, दोन आरोपींचा शोध सुरू
piece of knife found in pizza has taken place in Pimpri Chinchwad
पिंपरी-चिंचवड: काय सांगता? पिझ्झा मध्ये आढळला चाकूचा तुकडा, आधी डॉमिनोज च्या मॅनेजर ने केली होती टाळाटाळ नंतर केलं मान्य

याबाबत किरण कबाडे (वय ३६ रा. घोरपडे पेठ) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मकरंद आणि आरोपी सुदिन ओळखीचे आहेत. दोघे जण सॅलसबरी पार्क परिसरातील रिक्षा थांब्यावर रात्री थांबले होते. त्या वेळी मकरंदने घरातील वादाची माहिती सुदिनला दिली. घरातील वाद बाहेर सांगत नको जाऊ, असे सांगून सुदिनने मकरंदला शिवीगाळ केली.

त्यानंतर दोघांमध्ये वाद झाले. सुदिनने मकरंदवर चाकुने वार केले. या घटनेत मकरंद जखमी झाला. पसार झालेल्या सुदिनला पोलिसांनी अटक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.

Story img Loader