लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : खडकीतील होळकर पूल परिसरात नदीपात्रात एका तरुणाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही.
अमोल रमेश मंगळवेढेकर (वय ३५, रा. वडारवाडी, शिवाजीनगर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. खडकीतील होळकर पूल परिसरात नदीपात्रात उद्यान आहे. उद्यानातील एका झाडाला गळफास घेऊन तरुणाने आत्महत्या केली. पहाटे नेहमीप्रमाणे उद्यानात फिरायला आलेल्या नागरिकांना हा प्रकार पाहिला. त्यांनी याबाबतची माहिती विश्रांतवाडी पोलिसांना दिली.
आणखी वाचा-परीक्षा शुल्क कमी करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचा हिवाळी अधिवेशनावर दणका मोर्चा
पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. त्याच्याकडे असलेल्या कागदपत्रांवरुन पोलिसांनी ओळख पटवली. अमोल याच्या आत्महत्येमागचे निश्चित कारण समजू शकले नाही. त्याचा कोणाशी वाद झाला का?, यादृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.