लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: पुणे स्टेशन परिसरात तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. खून झालेल्या तरुणाची ओळख पटलेली नाही.
खून झालेल्या तरुणाचे वय अंदाजे ३० ते ३५ वर्ष असून तो फिरस्ता असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलीस शिपाई ज्ञानेश्वर गायकवाड यांनी या संदर्भात बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुणे स्टेशन परिसरात मालधक्का परिसरात मारुती मंदिराजवळ एक तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तरुणाच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. तरुणाची ओळख पटू नये म्हणून चेहरा दगडाने ठेचून विद्रुप करण्यात आला आहे. तरुणाची ओळख पटलेली नसून सहायक पोलीस निरीक्षक मधाळे तपास करत आहेत.