लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पिंपरी : पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून एका तरुणाचा झोपेतच धारदार शस्त्राने गळा चिरून खून करण्यात आला. ही घटना बुधवारी (१८ सप्टेंबर) मध्यरात्री दीडच्या सुमारास बावधन येथे घडली. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.

प्रवीण महतो (वय २५) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. राजीवकुमार महतो आणि त्याच्या साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आणखी वाचा-पिंपरी-चिंचवडमध्ये गणेश विसर्जनाचा जल्लोष

हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बावधन चौकी जवळ असलेल्या एका नर्सरीमध्ये प्रवीण याचा धारदार हत्याराने झोपेत असतानाच गळा चिरून खून करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांना ताब्यात घेतले. राजीवकुमार महतो याला त्याच्या पत्नीसोबत प्रवीण याचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. त्या कारणावरून त्याने त्याच्या एका साथीदारासोबत मिळून प्रवीणला ठार मारण्याचा विचार केला. प्रवीण झोपेत असताना त्याचा गळा चिरून खून केला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.