लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : दादागिरी, तसेच फ्लेक्स फाडल्यामुळे गणेश पेठेत तरुणावर कोयत्याने वार करुन खून करण्यात आल्याचे तपासात उघडकीस आले आहे. गुन्हे शाखेने या प्रकरणी दोघांना अटक केली आहे.

Ritika Malu Hit and Run Case CID officers help accused
नागपूर : सीआयडी अधिकाऱ्यांची आरोपींना मदत; रितिका मालू ‘हिट अँड रन प्रकरण’
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
A young man was brutally beaten to death due to an immoral relationship in Nagpur
विवाहित प्रेयसीची अंधारातील भेट प्रियकराच्या जीवावर बेतली
Two hundred acres of farmland damaged by rangava in Shirala
शिराळ्यात गव्यांकडून दोनशे एकर शेतीचे नुकसान
pune traffic police loksatta news
पुणे: वाहतूक पोलिसांच्या कारवाईत खून प्रकरणातील आरोपीचा शोध
Evidence that Vishal Gawli of Kalyan is mentally ill kalyan news
कल्याणच्या विशाल गवळीकडे मनोरुग्ण असल्याचे दाखले;  याच आधारावर यापूर्वी जामीन मिळविल्याची माहिती
Suspension of police, police indecent behaviour with girl,
पुणे : अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन
teacher lost 20 lakh rupees share market
शिक्षकाला वीस लाखांचा गंडा, सुरतचे तीन आरोपी गजाआड; बुलढाणा सायबरची कारवाई

तुषार राजु कुंदुर (वय २१) आशुतोष संतोष वर्तले (वय २० दोघेही रा. गणेश पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सिद्धार्थ नंदकुमार हादगे (वय २९, रा. गणेश पेठ) असे खून झालेल्याचे नाव आहे. रविवारी मध्यरात्री सिद्धार्थ हादगे आणि सुमित चव्हाण गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी तुषार कुंदुर, अशिष कुंदुर, हर्षल पवार याच्यासह साथीदारांनी वैमनस्यातून हादगे याचा पाठलाग करुन त्याच्यावर कोयत्याने वार केले. उपचारांपूर्वीच सिद्धार्थ याचा मृत्यू झाला.

आणखी वाचा-सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक नाशिकचे पोलीस आयुक्त

गुन्हे शाखेच्या युनिट एककडून तपास करण्यात येत होता. आरोपी कुंदुर कोथरुड भागात थांबल्याची माहिती पोलीस हवालदार अजय थोरात आणि अनिकेत बाबर यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्यांना ताब्यात घेतले. आरोपींची चौकशी करण्यात आली. दोन वर्षांपूर्वी सिद्धार्थने भांडणातून तुषार कुंदुर आणि त्याचा भाऊ आशिष कुंदूर यांच्यावर शस्त्राने वार केले होते. त्यानंतर हादगे तुषार आणि त्याचाभावाला शिवीगाळ करत होता. गेल्या महिन्यात २४ ऑक्टोबर रोजी कोजागिरी पोर्णिमेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. फ्लेक्स फाडल्यामुळे त्यांच्यात पुन्हा भांडणे झाली होती. रागातून आरोपींनी हादगेचा खून केल्याची कबुली दिली.

पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सुनिल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, उपनिरीक्षक रमेश तापकीर, अजय थोरात, अनिकेत बाबर, महेश बामगुडे, लेश साबळे, दत्ता सोनवणे आदींनी ही कामगिरी केली.

Story img Loader