लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: मैत्रिणीच्या मोबाइलवर लघुसंदेश पाठविल्याने दोन गटात हाणामारी झाल्याची घटना नगर रस्त्यावरील लोणीकंद भागात घडली.
आदेश कालीदास गायकवाड (वय २१, रा. लोणीकंद) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी प्रथमेश गायकवाड, गौरव ढमाले, सार्थक हरगुडे, प्रणव ढमाले (सर्व रा. पाटील वस्ता, लोणीकंद, नगर रस्ता) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आणखी वाचा-पुणे: कव्वालीचा कार्यक्रम बंद केल्याने उपाहारगृहात तोडफोड; टोळक्याविरुद्ध गुन्हा
आदेश याच्या मैत्रिणीच्या मोबाइल क्रमांकावर आरोपी गौरवने संदेश पाठविला होता. आदेश आणि त्याचा मित्र अनिकेत हरगुडे गौरवला समजावून सांगण्यास गेले होते. त्यावेळी गौरव, त्याचे साथीदार सार्थक, प्रणव, प्रथमेश यांनी आदेशवर कोयत्याने वार केला. भांडणात मध्यस्थी करणाऱ्या धनंजय उंद्रेला मारहाण करण्यात आली.
दरम्यान, या प्रकरणी परस्परविरोधी तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी आदेश गायकवाड, अनिकेत हरगुडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदेश आणि त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांनी प्रथमेश गायकवाडला (वय १९, रा. कोलवडी) मारहाण केली. सहायक पोलीस निरीक्षक गजानन जाधव अधिक तपास करत आहेत.