लोकसत्ता प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पुणे : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाकडील मोबाइल संच दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना केळकर रस्त्यावर घडली.
याबाबत तरुणाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुण मूळचा सोलापूर जिल्ह्यातील दारफळ गावाचा आहे. तो स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पुण्यात आला आहे. शनिवार पेठेतील एका सोसायटीत तो राहायला आहे. दोन दिवसांपूर्वी तो रात्री साडेअकराच्या सुमारास अभ्यासिकेतून तो घरी निघाला होता. केळकर रस्त्यावर रमणबाग प्रशालेजवळील चौकात दुचाकीस्वार चोरट्यांनी तरुणाच्या हातातील १५ हजार रुपयांचा मोबाइल संच हिसकावून नेला. पोलीस हवालदार सुरवसे तपास करत आहेत.
शहरात गेल्या काही महिन्यांपासून पादचाऱ्यांना लुटण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दिवाळी संपल्यानंतर पादचाऱ्यांकडील मोबाइल संच हिसकावून नेणे, तसेच लुटमारीच्या घटना वाढीस लागल्या आहेत.