सार्वजनिक न्यास नोंदणी तथा धर्मादाय सह आयुक्त कार्यालयात धर्मादाय आरोग्य सेवक म्हणून नोकरी लावण्याचे आमिष दाखवून गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तीन तरुणांना बनावट नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत.

याबाबत धर्मादाय कार्यालयातील (रुग्णालय) अधीक्षक क्रांती जाधव (वय ४५) यांनी कोरेगाव पार्क पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. धर्मादाय सह आयुक्त कार्यालयात तीन तरुण धर्मादाय आरोग्य सेवकपदी रूजू होणार होते. तिघांनी नियुक्तीपत्र दाखविले. त्यावेळी ते बनावट असल्याचे लक्षात आले. अधीक्षक जाधव यांनी याबाबतची माहिती घेतली असता त्यांना देण्यात आलेले नियुक्तीपत्र बनावट असल्याचे उघडकीस आले तसेच नियुक्तीपत्रावर पुणे विभागाच्या सह आयुक्तांची बनावट स्वाक्षरी करण्यात आली होती.

फसवणुकीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. फसवणूक झालेला एक तरुण पुरंदर तालुक्यातील आहेत. उर्वरित दोघेजण दौंड तालुक्यातील असल्याची माहिती कोरेगाव पार्क पोलिसांनी दिली. आरोपींना बनावट नियुक्तीपत्र देऊन फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी तिघांकडून पैसे घेतल्याचे उघडकीस आले आहे.

Story img Loader