लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: वाळत घातलेले कपडे खालच्या मजल्यावरील गॅलरीत पडल्याने ते काढत असताना चौथ्या मजल्यावरुन पडून तरुणीचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी परिसरात घडली.

after nephew shocked while dancing group of people beat up uncle with stone
पुणे :नाचताना पुतण्याचा धक्का लागल्याचे निमित्त,टोळक्याकडून काकाला बेदम मारहाण
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Boy drowned during Ganesh Virsajan in Nandurbar
नंदुरबारमध्ये गणेश विर्सजन करताना मुलाचा बुडून मृत्यू
Tiger in Anandvan area in Varora city Chandrapur
आनंदवन परिसरात वाघिणीचा बछड्यासह वावर
Three friends drowned Buldhana
बुलढाणा : पोहोताना तिघे मित्र बुडाले! दोघे बचावले, एकाचा मृत्यू
dumper and car accident on solapur road
सोलापूर रस्त्यावर डंपरची मोटारीला धडक; पिता-पुत्राचा मृत्यू, एकाच कुटुंबातील तिघे गंभीर जखमी
crime
pimpri crime: कोयता गँग सक्रिय? शुल्लक कारणावरून कोयत्याने वार
Man murders wife for not giving birth to child Nagpur crime news
मूल होत नसल्याने पत्नीचा खून केला आणि मृतदेहाजवळ तब्बल सहा तास…

आकांक्षा गोपाल सिंग (वय २३, रा. समर्थ सिटी, शिवनगर, किरकटवाडी ) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे. आकांक्षा पंधरा दिवसांपूर्वी मावसबहिणीकडे राहण्यास आली होती. गॅलरीत वाळत घातलेले कपडे काढण्यासाठी आकांक्षा गेली. तेव्हा कपडे खालच्या मजल्यावरील गॅलरीत पडल्याचे लक्षात आले. ज्या गॅलरीत कपडे पडले होते. त्या सदनिकेचा दरवाजा बाहेरून बंद होता. आकांक्षाने चौथ्या मजल्यावरील गॅलरीत साडी बांधली आणि खाली उतरण्यास सुरुवात केली. त्यावेळी तोल जाऊन ती खाली कोसळली. ही घटना घडली तेव्हा घरात कोणी नव्हते.

आणखी वाचा-होर्डिंग दुर्घटने प्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल; झाला होता पाच जणांचा मृत्यू

इमारतीच्या तळमजल्यावर खेळत असलेल्या मुलांना काहीतरी पडल्याचा आवाज आल्याने त्यांनी पाहिले. तेव्हा आकांक्षा रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. मुलांनी आरडाओरड केल्यानंतर इमारतीतील रहिवासी गोळा झाले. सिंहगड रस्ता परिसारतील कोल्हेवाडी येथे आकांक्षाच्या नातेवााईकांचे दुकान आहे. त्यांना या घटनेची माहिती कळविण्यात आली. आकांक्षाचे नातेवाईक तेथे पोहोचले. त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. हवेली पोलीस ठाण्यातील पोलिस कर्मचारी चंद्रकांत शिंदे घटनास्थळी पोहोचले. आकांक्षाला तातडीने उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच आकांक्षाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी हवेली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.