पुणे : भरधाव मोटार उलटून तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर स्वामी नारायण मंदिराजवळ झाला. अपघातात मोटारीतील सात जण जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.विजया बाजीराव पडवळ (वय २९, रा. शेळू, ता. आंबेगाव, जि. पुणे) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे. अपघातात पवन कहाते, विजय आंबेकर, सचिन मंजाबापू, गायत्री मोहिते, सुप्रिया लाड, संदीप मराठे जखमी झाले आहेत. भरधाव मोटार चालवून अपघातास जबाबदार ठरल्याप्रकरणी मोटारचालक प्रसाद दिलीप ढोले (वय २५, रा. सावरदरी, ता खेड, जि. पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अपघातात मोटारचालक ढोले जखमी झाला आहे. पाेलीस शिपाई प्रशांत चाटे यांनी याबाबत सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरधाव मोटार सोमवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरुन निघाली होती. नऱ्हे परिसरातील स्वामी नारायण मंदिराजवळ भरधाव मोटारीवरील नियंत्रण सुटले. माेटार उलटल्याने मोटारचालक प्रसाद याच्यासह मोटारीतल प्रवासी विजया, पवन, विजय, सचिन, गायत्री, सुप्रिया, संदीप गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमींना तातडीने खासगी रुग्णलयात दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान विजया यांचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक अक्षय पाटील तपास करत आहेत.

kalyan Drunk and drive drunkard car driver
कल्याणमध्ये मद्यधुंद कार चालकाची दहा दुचाकींना धडक, कार चालक अनिल तिवारी पोलिसांच्या ताब्यात
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
266 people died in road accidents in Raigad in year
रायगडमध्ये वर्षभरात रस्ते अपघातात २६६ जणांचा मृत्यू
One person died, eight injured , vehicle fell in valley,
ठाणे : वाहन दरीत कोसळून एकाचा मृत्यू तर आठ जण जखमी
Tragic Accident on mumbai Ahmedabad Express Highway
अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात दोघांचा मृत्यू, दोन जखमी
Two people on two-wheeler died in collision with speeding car
भरधाव मोटारीच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू, लोहगाव परिसरातील घटना
Maharashtra accident 11 deaths
तीन दुर्घटनांमध्ये ११ जणांचा मृत्यू, सोलापूर, जालन्यात मोटारींचे अपघात; चंद्रपुरात दुचाकीची ट्रकला धडक
Akkalkot collision between Scorpio and Eicher Truck four devotees died
अक्कलकोटजवळ मोटार आणि ट्रकच्या अपघातात चौघांचा मृत्यू , देवदर्शनासाठी गाणगापूरला जाताना काळाचा घाला
Story img Loader