पुण्याच्या आळंदीमध्ये आज सकाळी अज्ञात युवतीने इंद्रायणी नदीत उडी घेतली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून तरुणीने स्वतःला वाचवण्यासाठी नागरिकांना हाक देत असल्याचं व्हिडीओमधून स्पष्ट होत आहे. रविवारीदेखील पोलीस कॉन्स्टेबल अनुष्का केदार यांनी इंद्रायणी नदीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. अवघ्या चार दिवसांमध्येच ही दुसरी घटना घडलेली आहे.

हेही वाचा >>> पुण्यातील कोंढव्यात एटीएसचा छापा, बनावट टेलिफोन एक्स्चेंज सेंटरचा केला पर्दाफाश

आळंदीमधील इंद्रायणी नदीमध्ये अज्ञात युवतीने उडी घेतली आहे. या घटनेनंतर आळंदी पोलीस, एनडीआरएफची टीम युवतीचा शोध घेत आहेत. अज्ञात युवतीने उडी घेतल्यानंतर घटनेचा व्हिडीओ समोर आला असून ती स्वतःला वाचवण्यासाठी नागरिकांना हाक देत आहे. तोपर्यंत उशीर झाला होता. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने तरुणी वाहून गेल्याचे व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ तिथे उपस्थित असलेल्या व्यक्तीने आपल्या मोबाइलमध्ये कैद केला आहे. तसेच त्या ठिकाणच्या नागरिकांनी बघ्याची भूमिका घेतली. चार दिवसांमध्ये आळंदीच्या इंद्रायणी नदीत उडी घेतल्याची ही दुसरी घटना आहे. पैकी, पोलीस कॉन्स्टेबल अनुष्का केदार यांनी आत्महत्या केल्याचे निष्पन्न झालेले आहे.

Story img Loader