पिंपरी- चिंचवड : शहरातून जाणाऱ्या मुंबई- बेंगळुरू महामार्गावरील भुजबळ चौकातील अपघाताचा एक सीसीटीव्ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. भरधाव कारने इंजिनिअर तरुणीला पाठीमागून जोरात धडक दिल्याचं आणि तरुणी काही फूट लांब उडाल्याच सीसीटीव्हीत स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. हा सीसीटीव्ही हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असून तक्रार न दिल्याने वाहनचालकवर गुन्हा दाखल न करता सोडून दिल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. कार चालक हा इंजिनिअर असल्याचं सांगितलं जात आहे. हा सीसीटीव्ही २३ मे २०२४ चा असून आत्ताच सोशल मीडियावर का? व्हायरल होत आहे. असा प्रश्न ही उपस्थित होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई- बंगळुरू महामार्गावरील भुजबळ चौकातून इंजिनिअर तरुणी जात होती. अचानक भरधाव कार तिच्या दिशेने आली. तरुणीला पाठीमागून जोरात धडक दिली. भीषण धडक दिल्याने तरुणी काही फूट लांब दुकानात पडल्याचं व्हायरल सीसीटीव्ही पाहायला मिळतं आहे. सुदैवाने या अपघातात तरुणी किरकोळ जखमी झाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी चालकाला पोलीस ठाण्यात आणलं. परंतु, तरुणीने तक्रार दिली नाही, म्हणून त्याला सोडून दिलं. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

आणखी वाचा-पुणे : गुगलवरील कॉल गर्लचा मोबाईल नंबर बेतू शकतो जीवावर; कॉल गर्लमुळे तरुणाची आत्महत्या, नेमकं प्रकरण काय?

हिंजवडी पोलिसांनी यानंतर ही काही वेळा तरुणीशी आणि तिच्या काकांशी फोनवरून संपर्क करत तक्रारीबाबत विचारणा केली. परंतु, त्यांनी तक्रार देण्यास नकार दिला. अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. सध्या २३ मे २०२४ च्या ‘त्या’ अपघाताचा सीसीटीव्ही सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने अपघाताची चर्चा रंगली आहे. पोलिसांवर आरोप केले जात आहेत. पोलिसांनी स्वतः फिर्याद का दिली नाही? अशी विचारणा होत आहे.