सिंहगडावरील उंच कड्यावरुन सेल्फी काढण्याचा प्रयत्न एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. सेल्फी काढण्याच्या नादात हा तरुण तब्बल २५० फूट खोल दरीत पडला. ही घटना रविवारी सकाळी घडली. तुषार दळवी असे या तरुणाचे नाव असून तो गंभीर जखमी झाला आहे. रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तुषार दळवी हा रविवारी सकाळी आपल्या मित्रांबरोबर सिंहगडावर गेला होता. बारुदखाना पॉइंटवर सेल्फी घेताना तुषारचा तोल गेला आणि तो थेट २५० फूट खोल दरीत कोसळला. सिंहगड वनसंरक्षण समितीचे सुरक्षारक्षक आणि स्थानिकांनी जखमी तुषारला दरीतून वर काढले. तुषार गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Youngster collapsed in deep valley while taking selfie from sinhagad pune
Show comments