लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : पूर्वीच्या भांडणातून पाच जणांच्या टोळक्याने एका तरुणावर चाकूने वार करत बेदम मारहाण केली. तसेच, परिसरात दहशत निर्माण केल्याची घटना रहाटणी येथे घडली.

मन्सुर मेहबुब शेख (वय २४, रा. काळेवाडी) यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुरज प्रकाश पिंगळे (वय २४, रा. रहाटणी) व शुभम अभिमान जाधव (रा. गुजरनगर, थेरगाव) या दोघांना अटक केली आहे. तर, तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

आणखी वाचा-झोपडपट्टीतील युवकांना कौशल्यानुसार रोजगार; काय आहे उपक्रम…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मन्सुर व सुरज यांच्यामध्ये एक महिन्यापूर्वी वाद झाला होता. बुधवारी मन्सुर व त्यांचा मित्र प्रसाद चव्हाण उभे असताना त्यांना सुरज याने बोलावून घेतले. त्यावेळी मागच्या भांडणाचा राग मनात धरून सुरजने इतर साथीदारांना बोलावत मन्सुर यांना मारहाण केली. ‘तू काय इथला भाई झालाय का, मी इथला भाई आहे, माझी दहशत माहित नाही का तुला, असे म्हणत मन्सुर यांच्यावर चाकूने वार केला. तर, सुरजच्या साथीदाराने हातातील कोयत्याने वार केला. मात्र, तो मन्सुर यांनी चुकवला. त्यांचा मित्र प्रसाद वाचवण्यासाठी आला असता त्याला देखील मारहाण केली.

Story img Loader