पेट्रोल चोरी केल्याच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना नऱ्हे भागात घडली.उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांकडून नऱ्हे भागातील माजी उपसरपंचासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. समर्थ नेताजी भगत (वय २० रा. व्यंकटेश्वरा सोसायटी, अभिनव कॉलेज रोड, नऱ्हे) असे उपचारादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत नेताजी सोपान भगत यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> स्वारगेट, हडपसर भागातील जुगार अड्ड्यांवर गुन्हे शाखेचा छापा, आठजणांविरुद्ध गुन्हा दाखल

नऱ्हे भागातील मानाजीनगर भागात २५ नोव्हेंबर रोजी सकाळी सहाच्या सुमारास माजी उपसरपंच सुशांत कुटे यांच्या कार्यालयासमोर समर्थ भगत याच्या दुचाकीतील पेट्रोल संपले. पेट्रोल संपल्याने तो दुसऱ्या दुचाकीतून पेट्रोल काढत होता. त्यावेळी आरोपी गौरव संजय कुटे आणि साथीदारांनी त्याला चोर समजून लाथाबु्क्क्यांनी बेदम मारहाण केली. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या समर्थचा खासगी रुग्णलयात नुकताच मृत्यू झाला. त्यानंतर त्याच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार दिली.

हेही वाचा >>> VIDEO : लोणावळ्यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये फ्रीस्टाइल हाणामारी; व्हिडीओ व्हायरल

पोलिसांनी सुरुवातीला याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली, असा आरोप मारहाणीत मृत्युमुखी पडलेल्या समर्थ भगतच्या कुटुंबीयांनी केला आहे. माजी उपसरपंच पसार याप्रकरणी गौरव संजय कुटे (वय २४) अजिंक्य चंद्रकांत गांडले (वय २०) राहुल सोमनाथ लोहार (वय २३, सर्व रा. मानाजीनगर, नऱ्हे) यांना पोलिसांनी अटक केली. माजी उपसरपंच सुशांत सुरेश कुटे हा पसार झाला असून, त्याचा शोध घेण्यात घेण्यात येत आहे. आरोपींनी समर्थ भगत याला मारहाण केल्याची चित्रफीत पोलिसांना मिळाली आहे. आरोपीचे मोबाइल जप्त करण्यात आले आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Youth brutally beaten on suspicion of stealing petrol dies during treatment pune print news rbk 25 zws