पुणे : मोटार लावण्याच्या वादातून चौघांनी दोघांना बॅटने बेदम मारहाण केल्याची घडना बालेवाडीतील हायस्ट्रीट परिसरात घडली. एकाच्या डोक्यात बॅटचा फटका बसल्याने तो गंभीर जखमी झाला. याप्रकरणी तिघांना बाणेर पोलिसांनी अटक केली. प्रतीक बालवडकर असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी शुभम पाटील, अश्विन पावरा, मयूर पाटील यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याबरोबर असलेल्या एका साथीदाराविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ओम शिवाजी बांगर (वय २३, रा. शिंदे मळा, बाणेर) याने बाणेर पोलीस ठाण्यातफिर्याद दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ जानेवारी रोजी रात्री ओम बांगर हायस्ट्रीट परिसरातून निघाला होता. त्या वेळी प्रतीक बालवडकर याने त्याला बोलावून घेतले. रात्री सव्वाबाराच्या सुमारास ओम, प्रतीक आणि त्याचा मित्र हर्षल हायस्ट्रीट परिसरात गप्पा मारत थांबले होते. आरोपी शुभम पाटील, अश्विन पावरा, मयूर पाटील आणि साथीदार मोटारीतून तेथे आले. मोटार लावण्यावरुन त्यांच्यात वाद झाला. त्यांच्यात बाचाबाची झाली. मध्यस्थी केल्यानंतर त्यांच्यातील वाद मिटला. त्यानंतर मध्यरात्री पावणेएकच्या सुमारास आरोपी मोटारीतून तेथे आले. त्यांनी बॅटने ओमला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्या वेळी प्रतीकने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. बॅटचा फटका प्रतीकच्या डोक्यात बसल्याने तो गंभीर जखमी झाला. प्रतीक बेशुद्ध पडल्याने त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सहायक पोलीस निरीक्षक बी. आर. झरेकर तपास करत आहेत.