मावळात मित्रांसोबत वर्षाविहारासाठी आलेला नगरमधील तरुण बुडाल्याचा घटना कुंडमाळ परिसरात घडली. पाण्यात बुडालेल्या तरुणाचा शोध घेण्यात आला. मात्र, त्याचा ठावठिकाणा लागला नाही. ओंकार बाळासाहेब गायकवाड (वय २४, मूळ रा. अहमदनगर) असे बुडालेल्या तरुणाचे नाव आहे. ओंकार आणि त्याचे मित्र मावळातील कुंडमाळ परिसरात वर्षाविहारासाठी आले होते.

हेही वाचा >>> पिंपरी: किशोर आवारे खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार माजी उपनगराध्यक्ष भानू खळदे अखेर पोलिसांच्या ताब्यात

Rahul Gandhi poha Nagpur
राहुल गांधी नागपुरात आले आणि…टमाटरने सजवलेल्या तर्री पोह्यांसाठी थेट….
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
maharashtra assembly election 2024 many agricultural work disrupted due to election campaigning
प्रचारामुळे शेतीकामे ठप्प! शेतमजुरी ३००; तर राजकीय पक्षांकडून जेवणासह ४०० रुपये
Sindhudurg rain
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पाऊसाची हजेरी, बागायतदार चिंतेत
soil making for plants in glass pot
काचपात्रातील बागेसाठी माती तयार करताना…
konkan hapus mango season likely to deley due to prolonged monsoon
लोकशिवार: लांबलेल्या पावसाने ‘आंबा’ही लांबवला
banana cultivation farmer kiran gadkari tried different experiment for banana farming
लोकशिवार: आंतरपिकातील यश !

बंधाऱ्यावरुन ओंकार निघाला होता. पावसामुळे बंधारा निसरडा झाला आहे. पाय घसरुन ओंकार पाण्यात पडला. पाण्याचा वेग जास्त असल्याने तो वाहून गेला. त्याच्याबरोबर असलेल्या मित्रांनी आरडाओरडा केला. ओंकार वाहून गेल्याचे लक्षात आल्यानंतर मित्रांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. मावळ वन्यजीव रक्षक बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. बचाव पथकाने शोधमोहीम राबविली. ओंकार सापडला नाही.

हेही वाचा >>> खाद्यतेलात आत्मनिर्भर होण्यासाठी हवे सरकी उत्पादनाला बळ – अजय झुनझुनवाला यांचे मत

दुर्घटना घडण्यापूर्वी ओंकाराने मोबाइलवर छायाचित्रे काढली होती. मित्रांबरोबर पाण्यात खेळताना ओंकाराने मोबाइलवर चित्रफीत तयार केली होती. कुंडमाळ परिसरात वर्षाविहारासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येतात. दरवर्षी या भागात दुर्घटना घडतात. पर्यटकांनी काळजी घ्यावी, असे फलक लावण्यात आले आहेत. पर्यटक सुरक्षाविषयक सूचनांकडे काणाडोळा करतात. पाण्याचा वेग जास्त असल्याने दुर्घटना घडतात, असे तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजीत सावंत यांनी सांगितले.