पुणे : जंगली महाराज रस्त्यावर झाडाची फांदी डोक्यात पडून तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. जखमी झालेल्या तरुणावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आदित्य शिवाजी सौदागर (वय २३) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आदित्य हा जंगली महाराज रस्त्यावरील छत्रपती संभाजी उद्यानासमोर असलेल्या पीएमपी थांब्यावर बुधवारी सायंकाळी थांबला होता. त्यावेळी अचानक झाडाची फांदी त्याच्या डोक्यात पडली. गंभीर जखमी झाल्याने त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
selfie point shock death
भाईंदर: महापालिकेच्या सेल्फी पॉईंटमधील विजेचा धक्का, जखमी मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू
elderly woman rescued by fire brigade after being trapped in flat
सदनिकेत अडकलेल्या ज्येष्ठ महिलेची सुटका- बेशुद्धावस्थेतील महिलेवर त्वरीत उपचार केल्याने अनर्थ टळला
suniel shetty injured on hunter movie set
अभिनेता सुनील शेट्टीचा सेटवर झाला अपघात, स्वतःच अ‍ॅक्शन सीन शूट करताना झाला जखमी
Attempted murder of laborer due to argument over drinking
दारू पिताना झालेल्या वादातून मजुराचा खुनाचा प्रयत्न, भिडे पूल परिसरातील घटना
construction worker dies after gets trapped in jcb machine
जेसीबी यंत्राखाली सापडून बांधकाम मजुराचा मृत्यू
girl died while removing akash kandil
आकाशकंदिल काढताना तोल गेला, ११ व्या मजल्यावरून पडून तरुणीचा मृत्यू

हेही वाचा…पिंपरीतील रुग्णालय उडवण्याची धमकी देण्यासाठी ‘व्हीपीएन’चा वापर; पोलिसांची ‘गुगल’कडे धाव

वर्षभरापूर्वी शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिराजवळ थांबलेल्या अभिजीत गुंड या तरुणाच्या डोक्यात फांदी पडून त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. जंगली महाराज रस्त्यावर झाडाची फांदी दुचाकीस्वार महिलेच्या अंगावर कोसळल्याची घटना फेब्रुवारी महिन्यात घडली होती. बिबवेवाडी भागात झाडाची फांदी डोक्यात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.

हेही वाचा…‘ससून’ची बदनामी थांबवा! रुग्णालयाचे कर्मचारी आक्रमक; मोर्चाद्वारे थेट जिल्लाधिकारी कार्यालयावर धडकले

पावसाळा सुरू होण्यापूर्वी धोकादायक फांद्या महापालिकेच्या उद्यान विभागाकडून काढण्यात येतात. धोकादायक फांद्यामुळे गंभीर दुर्घटना घडल्या आहेत. उद्यान विभागाच्या दुर्लक्षामुळे कुजक्या फांद्या कोसळण्याच्या घटना घडतात, अशी तक्रार नागरिकांनी केली.