पुणे : आर्थिक व्यवहारातून २५ लाखांच्या खंडणीसाठी तरुणाचे अपहरण करण्यात आल्याची घटना घडली. गुन्हे शाखा आणि उत्तमनगर पोलिसांनी कारवाई करुन तरुणाची सांगली जिल्ह्यातील विटा परिसरातून सुटका केली. याप्रकरणी सहाजणांना अटक करण्यात आली.

अक्षय माेहन कदम (वय २८), विजय मधुकर नलावडे (वय २६), महेश मलिक नलावडे (वय २५), बोक्या उर्फ रणजीत दिनकर भोसले (वय २६), प्रदीप किसन चव्हाण (वय २६), अमोल उत्तम मोरे (वय ३२, सर्व रा. सांगली) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. शुक्रवारी (४ ऑगस्ट) रात्री साडेआठच्या सुमारास एनडीए रस्त्यावरील कोंढवे धावडे परिसरातून मोटारचालक तरुणाचे अपहरण करण्यात आले होते. याबाबत तरुणाच्या पत्नीने उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.तरुण मूळचा सांगली जिल्ह्यातील असून, तो ॲ्रप आधारित प्रवासी वाहतूक करतो. आरोपी अक्षय कदम मोटारचालक तरुणाच्या ओळखीचा आहे. अक्षय याचा सोने-चांदी दागिने विक्रीचा व्यवसाय आहे. मोटारचालक तरुण त्याच्याकडे कामाला होता. आर्थिक व्यवहारातून त्यांच्यात वाद झाला होता. गेल्या वर्षी नोेव्हेंबर महिन्यात तरुण आणि त्याची पत्नी पुण्यात वास्तव्यास आले. त्यांच्यातील वाद मिटला होता.

Manoj Jarange
Manoj Jarange : मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना सवाल, “खंडणीतला आरोपी तुमचं सरकार….”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Kalyan elder brother killed younger brother dispute
कल्याणमध्ये ५०० रूपयांच्या वादातून मोठ्या भावाकडून लहान भावाचा खून
Girl's Hair Cut case At Dadar Station
“म्हणून मी तिचे केस कापले…”, दादर स्थानकात तरुणीचे केस कापणाऱ्या आरोपीचा धक्कादायक खुलासा
student physically assaulted, government hostel ,
बुलढाणा : शासकीय वसतिगृहेदेखील असुरक्षित! अधीक्षकाचा विद्यार्थ्यावर अत्याचार
Image of Allahabad High Court
“पत्नीने अनैतिक संबंध न ठेवता इतरांना भेटणं म्हणजे…”, २३ वर्षांपासून वेगळं राहणार्‍या पती-पत्नीला घटस्फोट देताना न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी
police employee threatened and extorted shopkeepers in Azad Maidan area
वैमनस्यातून तिघांवर कोयत्याने वार, कासेवाडीतील घटना; सराइतांविरुद्ध गुन्हा
Rape in surat
शेअरचॅटवरील मित्राला मुंबईत भेटायला आली अन् नराधमानं गाठलं, पाच तासांत तीनवेळा बलात्कार; न्यायालयाने सुनावली कठोर शिक्षा

हेही वाचा >>>पाणी कपात मागे घेण्याचा निर्णय कागदावरच; पुण्यात गुरुवारी पाणीपुरवठा बंद

त्यानंतर ४ ऑगस्ट रोजी अक्षय आणि साथीदार मोटारचालक तरुणाच्या घरी रात्री साडेआठच्या सुमारास आले. त्यावेळी त्याची पत्नी घरी होती. अक्षयच्या साथीदारांनी पोलीस असल्याची बतावणी केली. तरुण घराबाहेर आल्यानंतर अक्षय आणि साथीदारांनी त्याचा मोबाइल ताब्यात घेतला. तरुणाला धमकावण्यात आले. तरुणाचे मोटारीतून अपहरण करण्यात आले. त्यानंतर तरुणाच्या पत्नीने पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार नोंदविली. आरोपींनी तरुणाच्या पत्नीच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. आरोपी वापरत असलेला मोबाइल क्रमांक नेपाळमधील होता. पतीला सुखरुप सोडायचे असेल तर तातडीने २५ लाख रुपयांची खंडणी द्यावी लागेल, अशी धमकी आरोपींनी त्यांना दिली. त्यानंतर पोलीस कर्मचारी संग्राम केंद्रे यांनी तांत्रिक तपास सुरु केला. आरोपी सांगली जिल्ह्यातील विटा परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तरुणाची विटा परिसरातून सुटका केली.

हेही वाचा >>>पुणे: टिंबर मार्केटमध्ये कोयता गँगकडून तिघांवर हल्ला

अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, प्रवीण पाटील, उपायुक्त सुहेल शर्मा, अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण बालवडकर, नंदकुमार बिडवई, सहायक निरीक्षक अभिजीत पाटील, उमेश रोकडे, किरण देशमुख, समीर पवार, सागर हुवाळे, किरण ठवरे, राजेंद्र लांडगे, उज्वल मोकाशी आदींनी ही कारवाई केली.

Story img Loader