पुणे – तळेगावजवळ पुणे मुंबई जुन्या महामार्गालगत थांबलेल्या तरुणाला, तू इथे का थांबलास? अशी विचारणा करत चार जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण करून तरुणाच्या छातीत चाकू भोसकून हत्या केली. याप्रकरणी चार जणांविरोधात तळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृष्णा शेळके असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना रविवारी रात्री आठच्या सुमारास घडलेली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्या झालेला कृष्णा शेळके हा त्याच्या इतर दोन मित्रांसह पुणे-मुंबई जुन्या महामार्गालगत अंधारात थांबला होता. तिघांना बघून चार अज्ञात व्यक्ती त्यांच्याकडे आले, तुम्ही इथं का थांबलात कशासाठी थांबलात? अशी विचारणा करत त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. चौघांपैकी एकाने चाकू काढून थेट कृष्णाच्या छातीत भोसकला. यात गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा – राज्यातील उच्च शिक्षण सहसंचालकांच्या बदल्या

हेही वाचा – वाढत्या प्रदूषणामुळे आरोग्याला धोका; राज्य सरकारकडून खबरदारीच्या उपाययोजनांना सुरुवात

चारही अज्ञातांनी त्या ठिकाणाहून पळ काढला. कृष्णा हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा नाही. केवळ अंधारात थांबल्यामुळे त्याला इतर चार व्यक्तींनी विचारना केल्याने त्यावरून त्याच्यासोबत वाद झाला. अशी माहिती तळेगाव पोलिसांनी दिली आहे. याघटने प्रकरणी तळेगाव पोलीस अज्ञात चार जणांचा शोध घेत आहेत.