पुणे : पुणे शहरातील वानवडी भागातील एका १७ वर्षीय तरुणाचे काही महिन्यांपूर्वी दोघांसोबत भांडण झाले होते. तो राग मनात धरून दोघांनी कोयत्याने तरुणावर सपासप वार केले. या घटनेमध्ये तरुणाचा मृत्यू झाला असून या प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली. यश सुनील घाटे वय १७ असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे, तर साहिल लतीफ शेख वय १८, ताहीर खलील पठाण वय १८ वर्षे दोन्ही रा. रामटेकडी हडपसर, अशी आरोपींची नावे आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – पुण्यात सायबर सुरक्षा, ‘डेटा सायन्स’मध्ये गलेलठ्ठ पगाराच्या संधी! सर्वाधिक वेतन कोणत्या क्षेत्रात जाणून घ्या…

हेही वाचा – घरांच्या किमतीतील वाढ सुरूच राहणार; क्रेडाई-कॉलियर्सचा अहवालातून नेमकं कारण समोर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यश सुनील घाटे हा तरुण आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास आदित्य चव्हाण, रेहान पठाण, श्रेयश शिंदे यांच्यासोबत रामटेकडी येथील जामा मस्जिदपासून कॉलेजला जात होता. त्यावेळी साहिल लतीफ शेख आणि ताहीर खलील पठाण हे दोघे पाठीमागून येऊन यशवर कोयत्याने वार करण्यास सुरुवात केली. या घटनेत यश हा गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. त्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी यश घाटे याला मृत घोषित केले. या प्रकरणातील आरोपी साहिल लतीफ शेख आणि ताहीर खलील पठाण यांना काही तासात अटक करण्यात आली आहे. जुन्या भांडणाचा राग मनात धरून यशचा खून केल्याची माहिती समोर आली असून आरोपींकडे अधिक चौकशी करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Youth murder by sickle incident in pune svk 88 ssb