पुणे : जेवण करून शतपावली करण्यासाठी निघालेल्या तरुणावर किरकोळ वादातून कोयत्याने वार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना हडपसर भागात घडली. अल्पवयीनांना तरुणाने मोबाइल संचातील हाॅटस्पाॅट यंत्रणा वापरण्यास नकार दिल्याने त्याचा खून करण्यात आल्याची धक्कादायक माहिती तपासात मिळाली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी तीन अल्पवयीनांना ताब्यात घेतले असून, एका तरुणाला अटक करण्यात आली.

वासुदेव रामचंद्र कुलकर्णी (वय ४७, रा. उत्कर्षनगर, हडपसर) असे खून झालेल्यांचे नाव आहे. याबाबत कुलकर्णी यांंचे भाऊ विनायक (वय ५२) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी मयूर भोसले (वय २० रा. वेताळबाबा वसाहत , हडपसर) याला अटक करण्यात आली आहे. कुलकर्णी कुटुंबीयांसह उत्कर्षनगर भागात राहायला आहेत. कुलकर्णी एका खासगी बँकेत कर्मचारी आहेत. रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ते शतपावली करण्यासाठी बाहेर पडले. उत्कर्षनगर परिसरातील पदपथावरुन ते निघाले होते. त्यावेळी पदपथावर थांबलेल्या अल्पवयीनांनी त्यांच्याकडे मोबाइलमधील हाॅटस्पाॅट यंत्रणा वापरास मागितले. कुलकर्णी यांनी त्यांना नकार दिला. या कारणावरुन वाद झाला. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या अल्पवयीनांनी कुलकर्णी यांच्यावर कोयत्याने वार केले. या घटनेत ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर हल्ला करून मुले पसार झाली.

Two youths attacked with a koyta in Khadki crime news Pune news
पुणे: खडकीत दोघा तरुणांवर कोयत्याने वार
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
accused in satish wagh murder case get police custody till december 20
Satish Wagh Murder: सतीश वाघ खून प्रकरणातील आरोपींना २० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
Satish wagh murder case, Pune police,
सतीश वाघ हत्या प्रकरण : आरोपींच्या शोधासाठी पुणे पोलिसांची १६ पथके रवाना
kidnap of uncle of MLA Yogesh Tilekar, Yogesh Tilekar uncle, Yogesh Tilekar latest news,
आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण, पोलिसांकडून अपहरणकर्त्यांचा शोध
villagers rescue accused as well as cop falls into well In sangamner taluka
पुढे आरोपी, मागे पोलीस पाठलागाचा थरार ! आरोपी पाठोपाठ पोलीसही पडला विहिरीत
container ran into food court, Khalapur,
खालापूर जवळ नियंत्रण सुटल्याने कंटेनर फुड कोर्टमध्ये घुसला; एकाचा मृत्यू, तीन वाहनांचे नुकसान
Bibvewadi school girl murder, girl murder,
एकतर्फी प्रेमातून कबड्डीपटू शाळकरी मुलीचा खून करणाऱ्या आरोपीला फिर्यादीने ओळखले, न्यायालयीन सुनावणीत फिर्यादीची साक्ष

हेही वाचा – धक्कादायक : किरकोळ वादातून बँक कर्मचाऱ्यावर कोयत्याने वार करून खून, हडपसर भागातील घटना; तीन अल्पवयीनांसह चौघे ताब्यात

कुलकर्णी पदपथावर रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती एकाने पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. हडपसर भागातील बंटर स्कूल परिसरातील वसाहतीत राहणाऱ्या तीन अल्पवयीन मुलांसह एकाला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी किरकोळ वादातून कुलकर्णी यांच्यावर कोयत्याने वार केल्याची कबुली दिली. कुलकर्णी यांची मुलांशी ओळखदेखील नाही. कुलकर्णी खासगी बँकेकडून गृहकर्ज मिळवून देण्यात मध्यस्थी करायचे. त्यांचे शनिवार पेठेत कार्यालय आहे, असे हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांनी दिली. पोलीस निरीक्षक पांढरे तपास करत आहेत.

शहरात २४ तासात दोन खून

राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा रविवारी नाना पेठेत खून झाल्याची घटना घडली. त्यानंतर रात्री हडपसर भागात एका तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली.

हेही वाचा – आरटीईच्या ३१ हजारांहून अधिक जागा रिक्त; प्रवेशासाठी आणखी एक संधी मिळणार?

कुलकर्णी यांनी मोबाइल संचातील ‘हाॅटस्पाॅट’ यंत्रणेचा वापर करण्यास नकार दिल्याने अल्पवयीनांनी त्यांच्यावर कोयत्याने वार करून खून केल्याचे उघडकीस आले. गुन्हा घडल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास करून तीन अल्पवयीनांसह एका तरुणाला ताब्यात घेतले. – संतोष पांढरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हडपसर

Story img Loader