पुणे : स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या युवकाला दुचाकीवर असलेल्या थकीत दंड भरण्यास सांगितल्याने त्याने लोकमान्य टिळक चौकात सोमवारी धरणे आंदोलन केले.

दिवाळीच्या सुट्टीत युवक मूळगावी निघाला होता. दंड भरल्याशिवाय दुचाकी सोडणार नाही, असे पोलिसांनी सांगितले. युवकाने विनंती केल्यानंतर पोलिसांनी त्याला सोडले नाही. अखेर पोलिसांनी त्याची मनधरणी केली. मूळगावी पाठविण्याचे आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतर त्याने आंदोलन मागे घेतले.

husband of former BJP corporator, kidnapping,
पिंपरी : अपहरण, मारहाण प्रकरणी भाजपच्या माजी नगरसेविकेचा पती, माजी स्वीकृत सदस्यासह ११ जणांवर गुन्हा
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
court accepts report filed by eow against shiv sena leader ravindra waikar in Jogeshwari land scam mumbai
रवींद्र वायकर यांच्याविरोधातील जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण बंद; गुन्हे शाखेने दाखल केलेला अहवाल न्यायालयाने स्वीकारला
Akola Sessions Court sentenced family to death citing Mahabharata High Court disagreed
‘महाभारताचा’ उल्लेख करत फाशीची शिक्षा, उच्च न्यायालयाचे सत्र न्यायालयावर ताशेरे…
Accused who escaped after killing friend arrested
मित्राचा खून करून पसार झालेला आरोपी गजाआड, ससून रुग्णालय परिसरात कारवाई
Worli hit and run case, High Court, Mihir Shah claim,
वरळी हिट अ‍ॅण्ड रन प्रकरण : गुन्हा करताना सापडल्यानंतरही अटकेचे कारण सांगणे अपरिहार्य ? मिहिर शहाच्या दाव्यावर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
Attack on police officer on patrol
मुंबई : गस्तीवर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला

हेही वाचा >>>पुणे: सुरक्षिततेच्या दृष्टीने पुणे प्रथम क्रमांकाचे शहर; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे मत

राहुल धांडे स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. तो सोमवारी (१७ ऑक्टोबर) दुपारी तीनच्या सुमारास यवतमाळला निघाला होता. दुपारी सव्वातीनच्या सुमारास त्याची रेल्वे यवतमाळला रवाना होणार होती. राहुलचा मित्र दुचाकी चालवित होता. दुचाकी राहुलच्या नावावर होती. लोकमान्य टिळक चौकात त्याची दुचाकी पोलिसांनी अडवली. राहुलच्या दुचाकीवर दंड असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी कारवाई सुरू केली. दंडाची रक्कम भरल्याशिवाय दुचाकी सोडणार नाही, असे पोलिसांनी सांगितले. मी गावी निघालो आहे. आता माझ्याकडे पैसे नाही. ऑनलाइन दंड भरतो, असे त्याने पोलिसांना सांगितले. दरम्यान, रेल्वेची वेळ निघून गेल्यानंतर राहुलने रस्त्यावर आंदोलन सुरू केले. अर्धा ते पाऊणतास तो रस्त्यावर बसून होता. अखेर पोलिसांनी खासगी प्रवासी बसने यवतमाळला पाठविण्याची व्यवस्था करतो, असे आश्वासन राहुलला दिले. त्यानंतर त्याने आंदोलन मागे घेतले. भर रस्त्यात युवकाने आंदोलन केल्याने बघ्यांची गर्दी झाली होती.