लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : आर्थिक वादातून अभियांत्रिकी महाविद्यालयातील चौकातील उड्डाणपुलावरील सज्जावर चढून तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन दलाच्या जवानांकडून सज्जावर चढलेल्या तरुणाची सुखरुप सुटका करण्यात आली. तरुणाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

अभियांत्रिकी महाविद्यालय चौकातील उड्डाणपुलावरील सज्जात तरुण थांबला असल्याची माहिती नागरिकांनी अग्निशमन दलाला दिली. पोलिसांनी या घटनेची माहिती अग्निशमन दलाला कळविली. त्यानंतर तरुणाला सज्जावरुन उतरविण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान तेथे रवान झाले. नायडू तसेच कसबा अग्निशमन केंद्रातील रेस्क्यू व्हॅन तेथे रवाना करण्यात आली. तरुण पुलाच्या मधोमध थांबला होता. पोलिसांनी त्याला खाली उतरण्यास सांगितले. मात्र, तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जवानांनी त्याच्याशी संवाद साधला.

आणखी वाचा-अजित दादा पुन्हा आपल्या राष्ट्रवादीत या; युवा कार्यकर्त्यांची अजित पवारांना भर सभेत हाक!

अग्निशमन दलाचे वाहनचालक करीम पठाण, आकाश डुंबळे, विजय पिंजण, पंकज पाटील, अक्षय कांबळे, नवनाथ जेडगे, संतोष अरगडे, संदीप पवार, मयूर चव्हाण, प्रदीप पेडणेकर यांनी शिडीचा वापर करुन तरुणाला सुखरुप खाली उतरविले. तरुणाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. तरुण मूळचा महाडमधील आहे. पोलिसांनी त्याची चौकशी केली. तेव्हा त्याने आर्थिक वादातून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती खडकी पोलिसांना दिली. हे प्रकरण वारजे भागातील असल्याने त्याला वारजे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे, अशी माहिती खडकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश जगदाळे यांनी दिली.