पुणे: शहरात लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ससून रुग्णालय परिसर, तसेच वारजे भागात पादचाऱ्यांना शस्त्राचा धाक दाखवून त्यांना लुटण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी बंडगार्डन आणि वारजे पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याबाबत एका तरुणाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण भोसरीत राहायला आहे. तो सोमवारी सकाळी साडेपाचच्या सुमारास ससून रुग्णालयाजवळून निघाला होता. ससून रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर पाच चोरट्यांनी त्याला अडवले. त्याला कोयत्याचा धाक दाखवून १५ हजार रुपयांचा मोबाइल संच चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक गणेश चव्हाण तपास करत आहेत.

दुसऱ्या एका घटनेत वारजे भागातील रामनगर परिसरात पादचारी तरुणाला कोयत्याचा धाक दाखवून त्याच्याकडील ३०० रुपयांची रोकड लुटण्यात आली. याबाबत एका तरुणाने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार तरुण रामनगर भागात राहायला आहे. तो ८ फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास जेवण करुन बाहेर पडला. त्या वेळी चाैघांनी त्याला काेयत्याचा धाक दाखवून खिशातील रोकड काढून घेतली. पोलीस उपनिरीक्षक सुनील जगदाळे तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Youth robbed in front of sassoon hospital entrance pune print news rbk 25 amy