पिंपरी : दांडियाच्या कार्यक्रमावेळी झालेल्या भांडणाचा आणि चिखली परिसरात वाढत चाललेली प्रतिष्ठा याचा राग मनात धरून मित्राने दुग्धव्यावसायिक तरुणाचा पिस्तुलातून गोळ्या झाडून खून केल्याचे समोर आले.

कृष्णा उर्फ सोन्या हरिभाऊ तापकीर (वय २०, रा. महादेवनगर, चिखली) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सौरभ उर्फ सोन्या पानसरे आणि त्याचा साथीदार सिद्धार्थ कांबळे (दोघे रा. फलकेवस्ती, मोईगाव, ता.खेड) याच्याविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सोन्याचे मामा राजेंद्र कैलास कार्ले (रा.३८, रा.चांदुस, ता.खेड) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

A young man was brutally beaten to death due to an immoral relationship in Nagpur
विवाहित प्रेयसीची अंधारातील भेट प्रियकराच्या जीवावर बेतली
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Vishal Gawli News
Vishal Gawli : “विशाल गवळीने माझ्या मुलीला जवळ ओढलं, तिचं तोंड दाबलं आणि…”, पीडितेच्या आईने सांगितला दोन वर्षांपूर्वीचा ‘तो’ प्रसंंग
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
MLA Sandeep Kshirsagar On Santosh Deshmukh
Santosh Deshmukh Murder : संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला अद्याप अटक का नाही? पोलिसांवर दबाव आहे का? संदीप क्षीरसागर स्पष्टच बोलले
kalyan rape murder case vishal gawali
Video : शेगावात वैद्यकीय तपासणीनंतर विशाल गवळीची कल्याणकडे रवानगी, मध्यरात्री…
youth attacked police Mumbai, youth obstructed traffic ,
मुंबई : वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या तरुणाचा पोलिसावर हल्ला, हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल
kalyan east minor girl rape case
कल्याण पूर्वेतील अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी दोन जण अटक, दाढी करून पेहराव बदलत असताना विशाल गवळीवर पोलिसांची झडप

हेही वाचा – पुणे : ऑनलाइन औषध खरेदी करताना फसवणूक; आरोपीला पश्चिम बंगालमध्ये अटक

सोन्या तापकीर याचा दुग्धव्यवसाय होता. सोन्या आणि आरोपी सौरभ मित्र होते. मागीलवर्षी नवरात्र उत्सव दरम्यान विकास साने यांनी पाटीलनगर चिखली येथील मैदानावर दांडियाचे आयोजन केले होते. त्यावेळी सोन्या आणि सौरभ यांच्यात भांडण झाले होते. तसेच सोन्या याची चिखली परिसरात प्रतिष्ठा वाढत चालली होती. याचा राग मनात धरून आरोपी सौरभ याने सोन्याचा काटा काढण्याचा कट रचला.

हेही वाचा – पुणे : फ्लॅट खरेदी-विक्रीच्या नोंदणीसाठी आता दस्त नोंदणी कार्यालयात जाण्याची गरज नाही; जाणून घ्या कारण…

सोमवारी दुपारी सोन्या चिखली गावच्या कमानीसमोर थांबला होता. या वेळी दुचाकीवरून सौरभ हा त्याचा मित्र सिद्धार्थसह त्याच्याजवळ आला. त्यांनी पिस्तुलातून सोन्यावर दोन गोळ्या झाडल्या. गंभीर जखमी झालेला सोन्या रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. परिसरातील नागरिकांनी त्याला त्वरित नजीकच्या रुग्णालयात नेले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. चिखली पोलीस तपास करत आहेत.

Story img Loader